Dilip Kumar: अभिनेता दिलीप कुमार यांच्या प्रकृतीबाबत पत्नी सायरा बानो यांनी दिली महिती
या तपासणीसाठी त्यांना एक दोन दिवसांसाठी रुग्णालयात दाखल केले जाऊ शकते. मात्र, सध्या ते घरीच आहेत. त्यांच्यावर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरु आहेत.
प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार (Actor Dilip Kumar) यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिलीप कुमार यांच्या प्रकृतीबाबत (Dilip Kumar Health Condition) प्रसारमाध्यमांतून वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. यावर दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो ( Dilip Kumar Wife Saira Banu) यांनीच माहिती दिली आहे. दिलीप कुमार (Dilip Kumar) यांची प्रकृती चांगली आहे. चिंतेचे काहीच कारण नाही, असे सायरा बानो यांनी म्हटले आहे. एका वृत्तावाहिनीशी बोलताना सायरा बानो (Saira Banu) यांनी ही माहिती दिली.
सायरा बानो यांनी एबीपी या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, दिलीप कुमार यांची प्रतिकारक्षमता कमी झाल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले आहे. परंतू, त्यात कोणतेही तथ्य नाही. दिलपी कुमार यांची प्रकृती चांगली आहे. ते थोडे अस्वस्थ जरुर आहेत. त्यांची प्रकृती काहीशी बिघडली आहे. परंतू, अल्लाच्या कृपेने ते चांगले आहेत.
सायरा बानो यांनी पुढे बोलताना सांगितले की, दिलीप कुमार यांची नियमीत तपासणी केली जात आहे. या तपासणीसाठी त्यांना एक दोन दिवसांसाठी रुग्णालयात दाखल केले जाऊ शकते. मात्र, सध्या ते घरीच आहेत. त्यांच्यावर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरु आहेत. (हेही वाचा, Dilip Kumar 97th Birthday: घरातून पळालेले ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार पुण्यात विकायचे सँडविच, जाणून त्यांच्याविषयी काही आश्चर्यकारक गोष्टी)
कोरोना व्हायरस संसर्गाची पार्श्वभूमी ध्यानात घेऊन दिलीप कुमार यांना सुरुवातीपासूनच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यावर सायरा बानो यांनी सांगितले की, त्यांचे वय आणि एकूणच स्थिती पाहता सुरुवातीपासून काळजी घेतली जात आहे. ही काळजी घेणे त्यांचे आरोग्य आणि सध्याचे वातावरण पाहता आवश्यकही आहे.
दरम्यान, दिलीप कुमार यांचे दोन बंधू एहसान खान (90) आणि असलम (88) यांचे कोरोना व्हायरस संसर्गामुळे मुंबई येथील लिलावती रुग्णालयात निधन झाले. येत्या 11 डिसेंबरला दिलपी कुमार यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसाला ते 98 वर्षांचे होतील. परंतू, दिलीप कुमार यांच्या कुटुंबीयांच्या निकटवर्तीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची पार्श्वभूमी विचारात घेता दिलीप कुमार यांचा वाढदिवस साजरा केला जाण्याची शक्यता कमी आहे.