Ranveer Singh Nude Photoshoot: न्यूड फोटो शेअर करण्याचं स्वातंत्र्य तर स्वेच्छेने हिजाब परिधान करण्याचं का नाही? समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमींचा सवाल

आपल्याला नेमका कसा समाज हवायं, असा सवाल अबु आझमीं यांनी उपस्थित केला आहे.

Abu Azmi | (Photo Credit : Facebook)

अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) त्याच्या अतरंगी कपड्यांमुळे नेहमी चर्चेत असतो. अवॉर्ड कार्यक्रमात (Award Function), रिअलिटी शो (Reality Show) किंवा पत्नी दिपीका पदूकोण (Deepika Padukone) बरोबर एअरपोर्टवर (Airport) तो जेव्हा केव्हा स्पॉट (Spot) होतो तेव्हा कपड्याची मोठी चर्चा होताना दिसते. पण यावेळी रणवीर सिंह त्याच्या कपड्यांमुळे नाही तर त्याने कपडे न घातल्यामुळे चर्चेत आला आहे. कालचं रणवीरने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर (Instagram Account) त्याचे न्यूड फोटो (Nude Photo) शेअर (Share) केले आहेत.

 

रणवीरच्या या फोटोशूटवर (Photoshoot) त्याचे फॅन्स (Fans), बॉलिवूड (Bollywood) आणि सर्वस्तरातून विविध प्रतिक्रीया येत आहेत. कुणी रणवीरचं कौतुक करत आहेत तर कुणी ट्रोल (Troll) पण रणवीरच्या या फोटोशूटवर आता  समाजवादी पार्टीचे (Samajwadi Party) नेते अबु आझमींचा (Abu Azmi) यांनी सुचक ट्वीट (Tweet) करत सवाल उपस्थित केला आहे.  अबु आझमी यांनी  ट्वीट केलं आहे की, उघड्या शरीराचे प्रदर्शन करणे ही एक कला आणि स्वातंत्र आहे पण संस्कृतीनुसार मुलीने स्वेच्छेने हिजाब (Hijab) परिधान करणे हा अत्याचार आणि धार्मिक भेदभाव समजला जातो. आपल्याला नेमका कसा समाज हवायं, असा सवाल अबु आझमीं यांनी उपस्थित केला आहे. अबू आझमींच्या या ट्वीटची सोशल मिडीयावर (Social Media) जोरदार चर्चा होत आहे. (हे ही वाचा:-Salman Khan: अभिनेता सलमान खानचा मुंबई सीपी कार्यालयात शस्त्र परवान्यासाठी अर्ज)

 

आता रणवीरच्या फोटोशूटला राजकीय रंग आल्याने पुढे यासंबंधी काय घडामोडी घडतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. न्यूड फोटो शेअर करण्याचं स्वातंत्र्य तर स्वेच्छेने हिजाब परिधान करण्याचं का नाही? असा थेट सवाल विचार अबू आझमींनी बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. रणवीरच्या या पोस्ट नंतर आता हिजाबचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तसेच या ट्वीटमध्ये अबु आझमींनी रणवीर सिंह, अमीर खान (Amir Khan) आणि मिलिंद सोमन (Milind Soman) या बॉलिवूड अभिनेत्यांचे फोटो शेअर केले आहेत.