Bigg Boss 15: अभिजित बिचुकले यांचा सलमान खानच्या 'शो'मध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश, पाहा व्हिडिओ

आधीच देवोलीना भट्टाचार्जी शमिता शेट्टीवर निशाणा साधताना दिसत आहे आणि राखी सावंत तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांना टोमणे मारताना दिसुन आले आहे.

Abhijeet Bhichukale Entry Bigg Boss15 (Photo Credit - Instagram)

माजी 'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) स्पर्धक आणि राजकारणी अभिजित बिचुकले (Abhijeet Bichukale) यांची कोविड -19 (Covid-19) टेस्ट पॉझिटिव्ह आली होती आणि वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून त्यांना प्रवेश नाकारला गेला होता, पण अभिजित बिचुकले  'बिग बॉस 15' (Bigg Boss 15) मध्ये सामील झाले आहे. रिलीज केलेल्या प्रोमोमध्ये त्याची एंट्री वाईल्ड कार्ड म्हणून दाखवण्यात आली आहे आणि ते घरामध्ये काय हंगामा बनवणार आहे, हे पाहणे मनोरंजक असेल. आधीच देवोलीना भट्टाचार्जी शमिता शेट्टीवर निशाणा साधताना दिसत आहे आणि राखी सावंत तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांना टोमणे मारताना दिसुन आले आहे. (हे ही वाचा 83 Teaser: Ranveer Singh ची मुख्य भूमिका असलेला सिनेमा '83' 24 डिसेंबरला होणार चित्रपटगृहात रीलीज; 30 नोव्हेंबरला येणार ट्रेलर.)

बिचुकले यांनी घरात प्रवेश करण्यापूर्वीच सांगितले आहे की ते हा शो अधिक मनोरंजक बनवणार आणि जर त्यांना पाठिंबा मिळाला तर ते या सीझनचे विजेते पण होतील. आता ते पुन्हा दाखल होत असल्याने त्याचा खेळ आणि डावपेच पाहण्यासाठी त्यांचे चाहते नक्कीच उत्सुक असतील. आणि त्याच्या म्हणण्यानुसार ते शोमध्ये मनोरंजनाचे समीकरण जोडतील कारण त्यानी सांगितले होते कि ते फक्त त्यांची लोकप्रियता वाढवण्यासाठी लढतात आणि आत गेल्यानंतर ते चांगल्या प्रकारे गेम हाताळतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

शिवाय सूत्रांवर विश्वास ठेवला तर पारस छाबरा आणि विशाल कोटियन देखील वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून घरात प्रवेश करू शकतात. पण चॅनलकडून काहीही अद्याप माहिती मिळालेली नाही आहे.