Amir Khan ची आई Zeenat Khan यांना हृदयविकाराच्या झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
बातमीनुसार, आमिर त्याच्या आईसोबत त्याच्या पाचगणीच्या घरात दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी आला होता. जिथे त्याच्या आईला हृदयविकाराचा झटका आला.
आमिर खानची (Amir Khan) आई झीनत अमान (Zeenat Aman) यांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला आहे. त्यामुळे त्यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आले आहे. बातमीनुसार, आमिर त्याच्या आईसोबत त्याच्या पाचगणीच्या घरात दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी आला होता. जिथे त्याच्या आईला हृदयविकाराचा झटका आला. मात्र आता आमिरच्या आईची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. (हे देखील वाचा: Juhi Chawla: मुंबईत एखाद्या गटारात राहतोय असे वाटते, अभिनेत्री जुही चावलाचं मुंबईच्या स्वच्छतेवर अजब ट्वीट)
याबाबत आमिर खानने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. बातम्यांनुसार, आमिरला त्याच्या आईच्या प्रकृतीबाबत कोणत्याही प्रकारची अफवा पसरवायची नाही. झीनतवर ब्रीच कँडी येथे उपचार सुरू असून त्यांची नाडी स्थिर आहे. तसेच, उपचारादरम्यान त्या प्रतिसाद देत आहे.
आमिर खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो लाल सिंह चड्ढा या चित्रपटात शेवटचा दिसला होता. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाबाबत आमिरला दीर्घ बहिष्काराला सामोरे जावे लागले होते. ज्याचा परिणाम असा झाला की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपत्तीजनक ठरला. अद्वैत चंदन दिग्दर्शित हा चित्रपट हॉलिवूडच्या कल्ट फिल्म फॉरेस्ट गंपचा हिंदी रिमेक होता. या चित्रपटात आमिरच्या सोबत करीना कपूर दिसली होती.
(The above story first appeared on LatestLY on Oct 31, 2022 09:49 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

