Sitaare Zameen Par: आमिर खानने जाहीर केली 'सीतारे जमीन पर'च्या प्रदर्शनाची तारीख, फस्ट लूक आला समोर

यावेळी चित्रपटात आमिर खानसोबत जेनेलिया देशमुख देखील मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 20 जून 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. आता प्रेक्षकांना चित्रपटाची थीम आणि आमिर खानच्या व्यक्तिरेखेबद्दल जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे.

Sitaare Zameen Par (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Sitaare Zameen Par: आमिर खान (Aamir Khan) चा बहुप्रतिक्षित चित्रपट 'सितारे जमीन पर' ची रिलीज डेट (Sitaare Zameen Par Release Date) पोस्टरसह जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट 2007 मध्ये आलेल्या 'तारे जमीन पर'चा सिक्वेल आहे, ज्यामध्ये 10 नवीन चेहरे दिसणार आहेत. यावेळी चित्रपटात आमिर खानसोबत जेनेलिया देशमुख देखील मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 20 जून 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. आता प्रेक्षकांना चित्रपटाची थीम आणि आमिर खानच्या व्यक्तिरेखेबद्दल जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे.

9 एप्रिल रोजी चीनमध्ये आयोजित मकाऊ कॉमेडी फेस्टिव्हलमध्ये आमिर खानने त्याच्या 'सितारा जमीन पर' चित्रपटाबद्दल बोलताना सांगितले की, 'सितार जमीन पर' चित्रपट जवळजवळ तयार आहे. हा 'तारे जमीन पर' चा सिक्वेल आहे. हा चित्रपट अपंग श्रेणीतील लोकांवर आधारित आहे. हा चित्रपट प्रेम, मैत्री आणि आयुष्याबद्दल आहे. 'तारे जमीन पर' ने तुम्हाला रडवले. हा चित्रपट तुम्हाला हसवेल. ही एक विनोदी कथा आहे, पण थीम तीच आहे. (हेही वाचा - Aamir Khan Finds Love Again: अभिनेता आमिर खान पुन्हा एकदा प्रेमात पडला? बेंगळुरूमधील एका महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा)

दरम्यान, आमिरने त्याच्या व्यक्तिरेखेबद्दल माहिती देताना पुढे म्हटले की, 'तारे जमीन पर' मधील माझे व्यक्तिरेखा निकुंभ एक संवेदनशील व्यक्ती होती. या चित्रपटातील माझ्या पात्राचे नाव गुलशन आहे आणि हे त्याच्या अगदी विरुद्ध आहे. तो असभ्य आहे, राजकीयदृष्ट्या चुकीचा आहे आणि सर्वांचा अपमान करतो. तो त्याच्या पत्नीशी आणि आईशी भांडतो. तो एक बास्केटबॉल प्रशिक्षक आहे जो त्याच्या वरिष्ठ प्रशिक्षकाला हरवतो. तो असा माणूस आहे जो अंतर्गतरित्या अनेक गोष्टींशी संघर्ष करत आहे. या चित्रपटात 10 लोक आहेत. यातील काहींना डाउन सिंड्रोम आहे, काहींना ऑटिझम आहे. हे सर्व त्याला एक चांगला माणूस बनण्यास शिकवतात. मूळतः हा एक स्पॅनिश चित्रपट होता आणि आम्ही त्याची भारतीय आवृत्ती बनवली आहे. (वाचा - Aamir Khan And Girlfriend Gauri Spratt Video: सार्वजनिक कार्यक्रमात पहिल्यांदा आमिर खान आणि त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रेट दिसले एकत्र, पहा व्हिडिओ)

 

View this post on Instagram

 

A post shared by Aamir Khan Productions (@aamirkhanproductions)

'सितार जमीन पर'मध्ये 'या' कलाकारांच्या भूमिका -

'सितार जमीन पर' चित्रपटात गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा, आरुष दत्ता, आयुष भन्साळी, आशिष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर यांच्यासह 10 नवीन कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आर.एस. यांनी केले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement