Aala Re Aala Simmba Song : 'आला रे आला' गाण्यावर Ranveer Singh चा गोविंदा स्टाईल डान्स

'सिम्बा' (Simmba) या चित्रपटातील 'आंख मारे' (Aankh Marey)आणि 'बिन तेरे' (Bin Tere) या रिक्रिएट करण्यात आलेल्या गाण्यांनंतर चित्रपटातील नवं कोरं 'आला रे आला' (Aala Re Aala ) हे गाणं आज प्रदर्शित करण्यात आलं आहे.

Stills from Simmba Song Aala Re Aala (photo credits: T-Series)

Aala Re Aala Simmba Song: रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) आगामी 'सिम्बा' (Simmba) या चित्रपटातील 'आंख मारे' (Aankh Marey)आणि 'बिन तेरे' (Bin Tere) या रिक्रिएट करण्यात आलेल्या गाण्यांनंतर चित्रपटातील नवं कोरं 'आला रे आला' (Aala Re Aala ) हे गाणं आज प्रदर्शित करण्यात आलं आहे. मराठमोळ्या अंदाजातील, हजारो बॅकग्राऊंड डान्सर्सच्या साथीने साकारलेलं कलरफूल गाणं रसिकांसाठी पर्वणी आहे. रोहित शेट्टीच्या सिनेमाची 'झलक' दाखवणारं हे गाणं आहे. आले रे आला या गाण्यामध्ये रणवीर सिंग 'गोविंदा' स्टाईलने थिरकताना दिसत आहे. Simmba Song Aankh Marey: पाहा Ranveer-Sara चे जबरदस्त डान्स मूव्ह्ज आणि गोलमाल गँगची धमाल

'आला रे आला' हे गाणं देव नेगी (Dev Negi)आणि गोल्डी (Goldi)या गायकांनी गायलं आहे. तर या गाण्याचं संगीत दिग्दर्शन तनिष्क बागची (Tanishk Bagchi)यांचं आहे. गाणं फारसं दमदार नसलं तरीही त्याच्या भव्य रूपामुळे त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. Simmba Song Tere Bin: सिम्बा सिनेमातील 'तेरे बिन' या नव्या गाण्यात रणवीर-साराचा रोमांटिक अंदाज!

रणवीर सिंगसोबत या सिनेमात अभिनेत्री सारा अली खान झळकणार आहे. अजय देवगण या सिनेमामध्ये खास भूमिकेत दिसणार आहे. करण जोहर आणि रोहित शेट्टी यांनी एकत्र या सिनेमाची निर्मिती केली आहे. 28 डिसेंबरला हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे.



संबंधित बातम्या