बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे चं अनुराग कश्यपच्या 'निशांची' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण (Watch Teaser)
बाळासाहेब ठाकरे यांचा नातू, स्मिता ठाकरेंचा धाकटा लेक ऐश्वर्य आता बॉलिवूड मध्ये झळकणार आहे. 'निशांची' सिनेमातून तो रसिकांच्या भेटीला येणार आहे.
महाराष्ट्रात 'ठाकरे' म्हटलं की त्यांचा राजकीय क्षेत्रातील दबदबा समोर येत असला तरीही हे कुटुंब कलासक्त असल्याने आता चौथ्या पिढीतील ठाकरे राजकारणासोबतच सिने क्षेत्रामध्येही दिसत आहेत. बॉलिवूड, मराठी सिनेमांसोबत यापूर्वी राहुल ठाकरे, उर्वशी ठाकरे यांनी काम केल्यानंतर आता बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे (Aaishvary Thackeray) बॉलिवूड मध्ये अभिनेता म्हणून पदार्पण करत आहे. अनुराग कश्यप दिग्दर्शित 'निशांची' (Nishaanchi) सिनेमातून ऐश्वर्य बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. नुकतीच या सिनेमाची घोषणा झाली असून एक टीझर समोर आला आहे.
'निशांची' सिनेमाचा टीझर
View this post on Instagram
कोण आहे ऐश्वर्य ठाकरे
ऐश्वर्य ठाकरे हा स्मिता ठाकरे आणि जयदेव ठाकरे यांचा मुलगा आहे. स्मिता ठाकरे यांचा ऐश्वर्य हा धाकटा लेक आहे. जयदेव ठाकरेंसोबत घटस्फोटानंतर ऐश्वर्य आणि राहुल ठाकरे त्यांच्यासोबत राहतात. स्मिता ठाकरे स्वतः निर्मात्या आहेत. यापूर्वी स्मिता ठाकरेंचा मोठा लेक राहुल ठाकरे याने राडा रॉक्स सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे. तर आमिर खानच्या पीके चित्रपटासाठी त्याने राजू हिरानी यांचा सहाय्यक म्हणूनही काम पाहिले होते. आता ऐश्वर्य ठाकरे बॉलिवूड मध्ये येणार आहे. नक्की वाचा: बाळासाहेब ठाकरेंचा नातू Aishwarya Thackeray व अभिनेत्री Aalia Furniturewalla यांच्या डेटिंगची चर्चा; समोर आले 'हे' सत्य.
ऐश्वर्य ठाकरेसोबत 'निशांची' सिनेमात वेदिका पिंटो, मोनिका पवार, मोहम्मद झीशान अय्यूब आणि कुमुद मिश्रा यांसारखे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. 'निशांची'हा सिनेमा 19 सप्टेंबरला रीलीज होणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jun 18, 2025 11:33 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

