Radhika Merchant Floral Dupatta: हळदी समारंभात राधिका मर्चंटने घातला खऱ्या फुलांनी बनवलेला दुपट्टा; (See Pics)
विशेष म्हणजे राधिकाने कापडी दुपट्ट्याऐवजी खऱ्या फुलांनी बनवलेला सुंदर दुपट्टा परिधान केला होता. राधिका मर्चंटची स्टाइल सेलिब्रिटी फॅशन स्टायलिस्ट रिया कपूरने केली होती.
Radhika Merchant Floral Dupatta: अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) 12 जुलैला लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाचे अनेक सोहळे उत्साहात साजरे केले जात आहेत. सोमवारी नीता (Nita Ambani) आणि मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या मुंबईतील घर अँटिलिया येथे या जोडप्याचा हळदी समारंभ पार पडला. हळदी समारंभासाठी (Haldi Ceremony) राधिकाने पिवळ्या रंगाचा आऊटफिट घातला होता. विशेष म्हणजे राधिकाने कापडी दुपट्ट्याऐवजी खऱ्या फुलांनी बनवलेला सुंदर दुपट्टा परिधान केला होता. राधिका मर्चंटची स्टाइल सेलिब्रिटी फॅशन स्टायलिस्ट रिया कपूरने केली होती.
यावेळी राधिका मर्चंट फॅशन डिझायनर अनामिका खन्ना यांनी डिझाइन केलेल्या चमकदार पिवळ्या नक्षीदार लेहेंगा सेटमध्ये दिसली. राधिकाने आपल्या सुंदर शैलीने सर्वांचे मन जिंकले आहे. राधिकाच्या या दुपट्ट्यात 90 हून अधिक झेंडूच्या फुलांचा वापर करण्यात आला आहे. हा दुपट्टा फ्लोरल आर्ट डिझाईन स्टुडिओने डिझाइन केला आहे. राधिकाचा हा दुपट्टा ताज्या फुलांनी तयार करण्यात आला होता. हा दुपट्टा तयार करण्यासाठी एक रात्र लागली. (हेही वाचा - Anant Ambani-Radhika Merchant Wedding: अनंत अंबानी- राधिका मर्चंट यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरूवात; पहा Mameru Ceremony चे फोटोज, व्हिडिओ)
राधिकाने केवळ ड्रेसच नाही तर या संपूर्ण लुकमध्ये तिने ताज्या फुलांची ज्वेलरी परिधान केली होती. तिच्या दागिन्यातमध्ये एक लांबलचक हार, कानातले, दुहेरी हार, हाताची फुले, हे सर्व ताज्या फुलांनी बनवलेले होते. (हेही वाचा - Anant Ambani-Radhika Merchant Wedding: मुंबईच्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे पार पडणार अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा; मुंबई पोलिसांनी 12 ते 15 जुलैसाठी जारी केले वाहतूक निर्बंध)
पहा फोटोज -
अनेक महिन्यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यानंतर अनंत आणि राधिका 12 जुलैला लग्नबंधणात अडकणार आहेत. राधिका मर्चंट ही उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे. त्यांच्या लग्नाचे तीन कार्यक्रम असतील जे तीन दिवस चालणार आहेत. प्रथम शुभ विवाह आणि नंतर 13 जुलै रोजी शुभ आशीर्वाद. तसेच 14 जुलै रोजी ग्रँड वेडिंग रिसेप्शन होणार आहे.