कोरोनामुळे पोलीस दलातील कॉन्स्टेबलच्या मृत्यूनंतर बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केला शोक
कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण देशात लॉकडाउन घोषीत करण्यात आले आहे. कोरोना विषाणू हे संपूर्ण जगावर आलेले मोठे संकट आहे. या संकटाच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जीवापाड प्रयत्न करत आहेत.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण देशात लॉकडाउन घोषीत करण्यात आले आहे. कोरोना विषाणू हे संपूर्ण जगावर आलेले मोठे संकट आहे. या संकटाच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जीवापाड प्रयत्न करत आहेत. तसेच यांच्या या कामगिरीचे संपूर्ण देशातून कौतूक केले असताना कोरोनामुळे एका पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अनेक कलाकरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यातच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनीही ट्वीटरच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.
कोरोना विषाणूपासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी पोलीस दल मोलाचा वाटा उचलत आहेत. यातच कोरोना विषाणूची लागण होऊन पोलीस कर्मचाऱ्याने आपला जीव गमवला आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून खंत व्यक्त करण्यात आली आहे. यातच अमिताभ बच्चन यांनीही ट्विटरच्या माध्यमातून पोलीस कॉन्स्टेबल यांना श्रद्धांजली वाहली आहे. दरम्यान, अमिताभ बच्चन म्हणाले आहेत की, हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू ही अत्यंत दुखद बातमी आहे. स्वताच्या जीवाची पर्वा न करता ते आपल्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहेत. त्यांच्या धैर्याला सलाम, असे ट्वीट त्यांनी केले आहे. सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव यांनीही ट्वीटरच्या माध्यमातून खंत व्यक्त केली आहे. तसेच कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी पोलीस दिवसरात्र काम करत आहेत. अशातच कोरोनामुळे हेड कॉन्स्टेबलच्या मृत्यूची बातमी मनाला चटका लावून जाणारी आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो व कुटुंबियांना धैर्य मिळो, अशी प्राथना मुंबई पोलिसांनी या ट्वीटरद्वारे केली आहे. हे देखील वाचा- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मानले आभार
अमिताभ बच्चन यांचे ट्वीट-
कोरोना विषाणूने संपूर्ण देशात थैमान घातला आहे. दिवसेंदिवस कोरोना विषाणूच्या संख्येत वाढ झाली आहे. भारतात आतापर्यंत 26 हजार 496 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोनामुळे 824 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 5 हजार 804 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. भारतात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत 7 हजार 628 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांपैंकी 323 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.