Bigg Boss Marathi 2, Episode 87 Preview: वीणा- शिव यांच्यावर घरातील सदस्य नाराज; पाहुणे दिगंबर नाईक, माधव देवचके कोणाला देणार सल्ला?
त्यामुळे आता पुढील आठवड्यात कोण घराबाहेर पडणार आणि तिकीट टू फिनाले कुणाला मिळणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
बिग बॉसच्या (Bigg Boss) घरात शिव (Shiv)आणि वीणा (Veena) या दोघांची जोडी नेहमी चर्चेचा विषय ठरत आहे. वीणा आणि शिव यांच्यात भांडण झाले किंवा कोणत्या कारणांवरुन वीणाला राग आला तर, शिव तिची मनधरणी करत असतो. यामुळे वीणानं शिवला 'जोरू का गुलाम' बनवलं असा आरोप घरातील सदस्यांनी शिववर केला आहे.
बिग बॉस सुरू झाल्यानंतर काही आठवड्यातच शिव आणि वीणामध्ये चांगली मैत्री झाली होती. घरातील इतर सदस्यांना त्यांची मैत्री खटकत होती. परंतु हे दोघे नेहमी एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे पाहायला मिळाले. अनेकदा पाहिले की, शिव नेहमीच वीणाच्या मागे-पुढे करत असतो. याच कारणांमुळे बिग बॉसच्या घरात सोमवारी रंगलेल्या 'बिचुकले की अदालत' या टास्कमध्ये सदस्यांनी शिववर 'जोरू का गुलाम' बनला असल्याचा आरोप लावला आहे. वीणा ही तिला हवे तसे वागत असते. मात्र शिवला तिच्या इच्छेप्रमाणे वागायला सांगते असा अरोप घरातील सदस्यांनी दोघांवर केला आहे.
Colors Marathi ट्वीट:
घरातील सदस्यांनी केलेला आरोपाकडे शिवने दुर्लष केले आहे. ते दोघही चांगले मित्र आहेत, वीणा चिडल्यावर शिव तिची मनधरणी करतो. हे त्याने मान्यही केले आहे. परंतु त्या दोघांनाही या गोष्टी आवडतात आणि त्यांच्यातील नाते असेच आहे, असे बोलत त्याने वीणाची बाजू सावरुन घेतली.