मलायका अरोरा आणि अर्जून कपूर करतायत लग्न?

मालायका अरोरा आणि अर्जून कपूर हे दोघांनी लवकरच लग्न करायचे ठरविले असल्याचे समोर येत आहे.

मालायका अरोरा आणि अर्जून कपूर (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

मालायका अरोरा आणि अर्जून कपूर हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडल्याचा चर्चा दिवसेंदिवस रंगत आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी हे दोघे एका लॅक्मे फॅशन विकमध्ये एकत्र दिसून आले होते. मात्र आता या दोघांनी लवकरच लग्न करायचे ठरविले असल्याचे समोर येत आहे.

मलायका आणि अर्जून हे दोघे एकमेकांच्या हातात हात घालून फिरतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आजवर या दोघांनी आपले नाते गुपित ठेवले होते. तर हे दोघे लवकरच लग्न करणार असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. तसेच या लग्नासंबंधित तयारी चालू झाली असून येत्या नव्या वर्षात मलायका विवाहबंधनात अडकणार आहे.

फिल्मफेअरकडून मिळालेल्या माहितीनुसार मलायका आणि अर्जूनला एकमेकांसोबत वेळ घालवण्यास खूप आवडते. तर हे दोघे या प्रेमसंबंधात असले तरीही लवकरच लग्नाची सुद्धा घोषणा करणार आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif