'अप्सरा धारा' कोकणी सिनेमाची कोलकता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील 'बाल चित्रपट 'विभागासाठी निवड; इजिप्त मध्ये चित्रित झालेला पहिला कोकणी चित्रपट
डॉक्टर रमेश कामथ यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन, कथा, पटकथा लिहली असून आता हा सिनेमा महाराष्ट्रात रीलीज होण्यापूर्वी बालदिनाच्या निमित्ताने 14 नोव्हेंबरला कोलकत्तामध्ये दाखवला जाणार आहे.
'यशाला शॉर्टकट नसतो' या संदेशावर आधारित आगामी कोकणी भाषेतील सिनेमा 'अप्सरा धारा' हा सिनेमा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. डॉक्टर रमेश कामथ यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन, कथा, पटकथा लिहली असून आता हा सिनेमा महाराष्ट्रात रीलीज होण्यापूर्वी बालदिनाच्या निमित्ताने 14 नोव्हेंबरला कोलकत्तामध्ये दाखवला जाणार आहे. कोलकता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील 'बाल चित्रपट 'विभागासाठी या सिनेमाची निवड झाली आहे.
मंगलोर येथील मास्टर सार्थक शेणॉय आणि कुमारी स्वाती भट या गुणीबालकलाकारांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत . बंगलोर चे सुप्रसिद्ध व्यावसायिक उद्योजक आणि दानशूर असणारे डॉक्टर दयानंद पै यांनी या चित्रपटात 'दयानंद' ही एक खास भूमिका केली आहे . बहुभाषिक चित्रपट कलावंत गोपीनाथ भट हे या चित्रपटात ग्राम प्रमुखाची भूमिका करत आहेत आणि सुप्रसिद्ध नाट्यकलावंत पी रोहिदास नायक हे आदर्श शिक्षक 'पिंटो ' ही व्यक्तिरेखा साकारत आहेत . दगडाचे सोन्यात रूपांतर करणाऱ्या परिकथेचा रहस्यमय घटक सुद्धा या चित्रपटात तुम्हाला आनंद देणार आहे. 'अप्सरा धारा' या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे इजिप्त मध्ये चित्रित झालेला पहिला कोकणी चित्रपट आहे आणि यात काही थ्री डी दृश्येही चित्रित केली आहेत .
'बेटी बचाओ बेटी पढाओ ' या विषयावर आधारित 'अप्सरा धारा ' हा त्यांचा सध्याचा चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे. रमेश कामथ यांनी यापूर्वी कोकणी भाषेतील 'जाना माना ' आणि 'आ वै जा सा ' हे यशस्वी चित्रपट दिले आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Nov 04, 2019 10:50 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

