अनुष्का शर्माने पती विराट कोहली सोबत साजरा केला आपला वाढदिवस; पहा विरुष्काचा रोमँटीक व्हिडीओ
धकाधकीच्या आयुष्यापासून दूर, एका निवांत ठिकाणी अनुष्का आणि विराटने हा दिवस एकत्र व्यतीत केला. याबाबतचा एक व्हिडीओ विराटने सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे.
2017 साली विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांनी लग्नगाठ बांधली. क्रिकेटमधील एक लोकप्रिय आणि महत्वाचे नाव, तर बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री; त्यामुळे खेळ आणि सिनेमा अशा दोन्ही क्षेत्रातील चाहत्यांनी या जोडीला खूप प्रेम दिले. परवा, 30 मे रोजी अनुष्काने आपला 30 वा वाढदिवस साजरा केला. धकाधकीच्या आयुष्यापासून दूर, एका निवांत ठिकाणी अनुष्का आणि विराटने हा दिवस एकत्र व्यतीत केला. याबाबतचा एक व्हिडीओ विराटने सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
लग्नाआधीपासून या दोघांच्या अफेअरची बरीच चर्चा रंगली होती. त्यानंतर लग्न आणि नंतर विविध कारणांनी जेव्हा जेव्हा दोघे एकत्र मिडीयासमोर आले तेव्हा तेव्हा त्या घटनांच्या बातम्या बनल्या. आताही हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. नदीच्या किनारी, सूर्य मावळतीला उतरत आहे, अशा वेळी हे नवराबायको एकमेकांसोबत गप्पागोष्टी करण्यात वेळ घालवत असल्याचा हा रोमँटीक व्हिडीओ आहे. (हेही वाचा: विराट-अनुष्का यांचे हॉलिडेज सेलिब्रेशन; विराटने शेअर केला खास फोटो)
दरम्यान, याधीही न्युझीलंडमधील एका जंगलात दोघेच फिरत असतानाचा यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. 11 डिसेंबर 2017 साली विराट आणि अनुष्का लग्नबेडीत अडकले होते. त्यावर्षीच्या सर्वाधिक चर्चित लाग्नापैकी हे लग्न ठरले होते. या लग्नाचाही एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता.