Big boss 12 : घरातून बाहेर पडलेल्या अनुप जलोटा यांचा खळबळजनक खुलासा; जसलीन माझी कधीच गर्लफ्रेंड नव्हती

अनेक वादविवादांनंतर अनुप जलोटा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले. घरातून बाहेर पडताच त्यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे.

अनूप जलोटा, जसलीन मथारू आणि सलमान खान (Photo Credits: Twitter)

बिग बॉसचे प्रत्येक पर्व कोणत्या ना कोणत्या कारणांनी नेहमीच गाजत असते. या वर्षीच्या बिग बॉसचे श्रीसंत आकर्षण ठरला तर अनुप जलोटा आणि जसलीन यांच्या नात्याने बिग बॉसला प्रसिद्धी मिळवून दिली. या कार्यक्रमाच्या 12व्या पर्वामध्ये सुरुवातीपासूनच मेलोड्रामा पाहायला मिळत आहे. अनुप जलोटांनी त्यांची शिष्या जसलीन मथारूसोबत ‘बिग बॉस 12’च्या घरात प्रवेश घेतला होता. हा प्रवेश घेताना आम्ही दोघेही तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहोत, हे नॅशनल टीव्हीवर सांगून अनुप व जसलीन यांनी खळबळ उडवून दिली होती. मात्र आता अनेक वादविवादांनंतर अनुप जलोटा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले. घरातून बाहेर पडताच त्यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे.

‘लोकांना आमचे मते कधीच कळले नाही. जसलीन मथारू माझी गर्लफ्रेन्ड नाही. तर ती माझी शिष्या आहे आणि मी तिचा गुरू आहे. आमचे नाते हे फक्त संगीतापुरतेच मर्यादित आहे. आमच्यामध्ये गर्लफ्रेन्ड-बॉयफ्रेन्डचे कुठलेही नाते नाही. ना आम्ही आजपर्यंत कुठल्या रोमॅन्टिक नात्यात होतो, ना आमच्यात शारीरीक संबंध होते. जसलीन माझ्या घरच्यांना अजून भेटलीदेखील नाही ’, असे अनुप यांनी सांगितले आहे. बिग बॉस शो स्क्रिप्टेड असल्याने आम्ही गुरु शिष्या ऐवजी प्रियकर-प्रेयेसी म्हणून आलो तर बिग बॉसला जास्त प्रसिद्धी मिळेल म्हणून हे सर्व आधीच प्लॅन केल होते.

 

View this post on Instagram

 

Moat awaited evection interview 1. . . ..LIKE COMMENT TAG YOUR FRIENDS @BIGBOSS12.2018 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ .  FOLLOW AND TURN ON POST NOTIFICATION because VIDEO POSTS WILL BE DELETED AFTER EVERY 2 DAYS OF UPLOAD  .  SO DON'T MISS ANY UNSEEN VIDEOS . .  . . Tag a bigboss lover!!! Follow this page for more updates... A bigboss fan . . ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ #bigboss12 #bigboss #biggboss12 #sunnyleone #shilpashinde #vikasgupta #bigbossseason12 #salmankhan #beingsalmankhan #aceofspace #hinakhan #bb12 #SREESANTH #sabakhan #somikhan #srishtyrode #romilChaudhary #nehapendse #meghadhade #roshmibanik #deepakthakur #urvashivani #surbhirana #dipikakakar #karanvirbohra #anupjalota #jasleenmatharu #shivashishmishra #tiktokindia #rohitsuchanti

A post shared by Bigboss Season 12 (@bigboss12.2018) on

जसलीनसोबतचे माझे नाते बिग बॉसने प्लॅन केले होते. शोच्या काही दिवस आधी आम्हाला ही गोष्ट सांगण्यात आली, अणि त्यानुसारच आम्ही बिग बॉसमध्ये वागत आलो. जसलीनच्या वडिलांनी आपल्या मुलीसोबत पार्टनर म्हणून या कार्यक्रमात जाण्याची मला विनंती केली. दोन-तिनदा त्यांनी मला विनंती केली अखेर मी तयार झालो. पण, त्यावेळी मी आणि जसलीन गुरु-शिष्य म्हणून कार्यक्रमात जाणार असल्याचं ठरलं होतं', असे अनूप जलोटा म्हणाले.

 

View this post on Instagram

 

shocking confession by anup..Anup and Jasleen were never in relationship with each other #anupjalota #jasleenmatharu

A post shared by Bollywood songs (@bollywood_tellywoodfanatic) on

अनूप जलोटा यांच्या या खुलाश्यानंतर बिग बॉसबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. लोक कुतूहलाने हा शो पाहतात मात्र या शो मधील गोष्टी या आधीच ठरलेल्या असतात. आधीच घरातील सदस्यांना कोणी कसे वागावे हे सांगितले जाते हे बिग बॉसचे सत्य अजून जलोटा यांच्या खुलाश्यामुळे समोर आले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now