2 वर्षांनंतर बच्चन यांच्या घरी दिवाळी पार्टी; काजोल-अजय देवगन, शाहरुख-गौरी खान, दीपिका-रणवीर सिंह, आलिया-रणबीर आदी सेलिब्रिटी कपल्स राहणार उपस्थित

अमिताभ गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमधील कलाकारांसाठी दिवाळी पार्टीचे आयोजन करतात. या पार्टीमध्ये बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी कपल्स उपस्थित राहणार आहेत.

Amitabh Bachchan Diwali party (Photo Credit - Instagram)

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी यंदा आपल्या घरी दिवाळी पार्टीचं (Diwali Party) आयोजन केलं आहे. अमिताभ गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमधील कलाकारांसाठी दिवाळी पार्टीचे आयोजन करतात. या पार्टीमध्ये बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी कपल्स उपस्थित राहणार आहेत. या पार्टीसाठी काजोल, अजय देवगन, शाहरुख-गौरी, दीपिका, रणवीर सिंह, आलिया, रणबीर, अक्षय कुमार, करण जोहर, संजय दत्त आदी कलाकार उपस्थित राहणार आहेत. (हेही वाचा - Padwa Gifts Ideas 2019: दिवाळी पाडव्या निमित्त बायकोला द्या ‘हे’ खास गिफ्ट)

2017 मध्ये बच्चन यांची सून ऐश्वर्याच्या वडिलांचे निधन झाले होते. तसेच 2018 मध्ये बच्चन यांच्या मुलीच्या सासाऱ्यांचे निधन झाले. त्यामुळे बच्चन कुटुंबात गेली 2 वर्षे  दिवाळी पार्टीचे आयोजन करण्यात आले नव्हतं. मात्र, यंदा दिवाळीच्या पहिल्या दिवशी बच्चन यांच्या घरी जंगी पार्टीचं आयोजन करण्यात येणार आहे.

अमिताभ बच्चन यांचे ट्वीट -

दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी आज आपल्या सर्व चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याबरोबरच अमिताभ यांनी जया बच्चन आणि श्वेता यांच्यासोबत दिवाळी साजरी करतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये बिग बी आणि जया बच्चन खूपच तरुण दिसत आहेत.