Jagame Thandhiram Trailer मधील अभिनेता Dhanush च्या लूकला चाहत्यांची पसंती, पाहा ट्रेलर

या धमाकेदार ट्रेलरमधील धनुषचा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

Jagame Thandhiram Trailer (Photo Credits: YouTube)

Jagame Thandhiram Trailer Out: मागील वर्षी कोरोनाची पहिली लाट देशात आली आणि सर्व सिनेमा हॉल बंद झाल्यामुळे अनेक चित्रपट निर्मात्यांनी आपले सिनेमे ओटीटी प्लेटफॉर्मवर प्रदर्शित केले. या यादीत आता दक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीचा प्रसिद्ध सुपरस्टार अभिनेता धनुष (Dhanush) याचा चित्रपट ‘जगमे थंदीरम’ (Jagame Thandhiram) याचेही नाव समाविष्ट झाला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या धमाकेदार ट्रेलरमधील धनुषचा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

धनुषचा ‘जगमे थंदीरम’ हा चित्रपट येत्या 18 जून रोजी प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात धनुष व्यतिरिक्त अभिनेत्री ऐश्वर्या लक्ष्मी जेम्स आणि अभिनेता जोजू जॉर्ज सारखे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे संगीत संतोष नारायण यांनी दिले आहे.हेदेखील वाचा- 'Radhe अजिबात चांगला चित्रपट नाही'; सलमान खानचे वडील Salim Khan यांनी दिली प्रामाणिक प्रतिक्रिया

पाहा Jagame Thandhiram ट्रेलर

जगमे थंदीरमचा ट्रेलर पाहून या चित्रपटाविषयीची उत्सुकता चाहत्यांमध्ये प्रचंड वाढली आहे. यात धनुषचा एका हटके लूकमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये धनुषचा हा लूक पाहून चाहते धनुषवर भलतेच खूश आहेत.

‘जगमे थंदीरम’ या चित्रपटात अभिनेता धनुष गुंडाच्या भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरमध्ये अभिनेता धनुष याची गँगस्टर भूमिका पाहिल्यानंतर त्याचे चाहतेही चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल बोलायचे, तर यात अभिनेता धनुष लंडनच्या रस्त्यावर मोठ्या गुंडांशी मारामारी करताना दिसतो आहे. त्यामुळे चाहत्यांची या चित्रपटाविषयीची उत्कंठता आणखी शिगेला पोहोचली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif