Aamir Khan आणि Saif Ali Khan पुन्हा एकत्र; झळकणार Vikram Vedha चित्रपटाच्या रिमेकमध्ये
निमित्त आहे एका तामिळ चित्रपटाच्या रिमेकचं. हा चित्रपट असणार आहे 2017 साली आलेला आणि सुपरहिट ठरलेला 'विक्रम वेधा' (Vikram Vedha).
'दिल चाहता है' (Dil Chahta Hai) ची हिट जोडी आमिर खान (Aamir Khan) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) पुन्हा एकदा तब्बल 19 वर्षांनंतर एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. निमित्त आहे एका तामिळ चित्रपटाच्या रिमेकचं. हा चित्रपट असणार आहे 2017 साली आलेला आणि सुपरहिट ठरलेला 'विक्रम वेधा' (Vikram Vedha).
'विक्रम वेधा' मध्ये आर माधवन आणि विजय सेतूपथ यांच्या मुख्य भूमिका होत्या. या रिमेक मध्ये विजयची गॅंगस्टरची भुमिका आमिर खान तर माधवनची पोलिसाची भूमिका सैफ करणार आहे. तर दुसरीकडे माधवन सुद्धा या चित्रपटात एक महत्वाची भूमिका करणार असल्याचं म्हटलं जात आहे. हा चित्रपट 2020 ला प्रदर्शित होतो आहे. अद्यापही या चित्रपटाच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही. (हेही वाचा. Box Office वर या आठवड्यात Release होणारे चित्रपट; वेगवेगळ्या विषयांची पर्वणी)
याआधी आमिर आणि सैफची दिल चाहता है मधली केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. हा चित्रपट दोघांच्याही करियर मध्ये अत्यंत महत्वाचा ठरला होता. तसेच मैत्री आणि मित्रांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाने शहरी जीवन दर्शवणाऱ्या चित्रपटांचा एक नवा ट्रेंड चित्रपटसृष्टीत सुरु केला होता. आता 19 वर्षांनंतर या दोघांची जादू पुन्हा प्रेक्षकांवर चालते का हे बघणं औत्सुक्याचं आहे. (हेही वाचा. सैफच्या आगामी लाल कप्तानचा ट्रेलर पाहून आमिर खान झालाय भलताच Impress, ट्विटर वर व्हिडिओ केला शेयर)
दुसरीकडे आमिर सध्या 'लाल सिंग चड्डा' या चित्रपटामध्ये व्यस्त आहे, तर सैफचा 'लाल कप्तान' या आठ्वड्यात प्रदर्शित झाला आहे.