Volkswagen च्या कारवर ग्राहकांना मिळणार तब्बल 1.6 लाखांपर्यंत डिस्काउंट, जाणून घ्या अधिक
जर तुम्ही नवी कार खरेदी करण्याचा विचार करत असल्यास तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी ठरु शकते. कारण Volkswagen च्या दोन कार Volkswagen Polo आणि Volkswagen Vento च्या निवडक वेरियंट्सवर कंपनीकडून तगडा डिस्काउंट दिला जाणार आहे. फॉक्सवॅगनच्या वेंटोच्या वेरियंट्सवर 1.6 लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जाणार आहे. या कारच्या कम्फर्टलाइन वेरियंटवर हा डिस्काउंट मिळणार आहे. तर एन्ट्री लेव्हल पोलो ट्रेडलाइनवर 29,000 रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे.
फॉक्सवैगन कम्फर्टलाइनच्या मिड स्पेक नॉन मॅटालिकची किंमत 9.99 लाख रुपये आहे. या महिन्यात कंपनी या मॉडेलवर जबरदस्त डिस्काउंट देत आहे. सध्याच्या काळात ही कार ग्राहकांना 8.39 लाख रुपयांना खरेदी करता येणार आहे. म्हणजेच या कारवर 1.6 लाख रुपयांचा बंपर डिस्काउंटसह खरेदी केली जाऊ शकते.(24.7 kmpl मायलेज देणारी Honda कंपनीच्या 'या' कारवर दिली जातेय जबरदस्त डिस्काउंट, जाणून घ्या अधिक)
वेंटो हाईलाइन प्लस MT वेरियंटला 1.09 लाख रुपयात खरेदी करता येणार आहे. या मॉडेलची किंमत 12.08 लाख रुपये आहे. वेंटोच्या अॅटोमेटिक वर्जनवर कोणताही डिस्काउंट ऑफर करत नाही आहे. या कारचची एन्ट्री लेव्हल ट्रेडलाइनवर 29,000 रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. या कारची किंमत 5.59 लाख रुपये आहे. या कारच्या कम्फर्टलाइन वेरियंटवर 23,000 रुपयांचा डिस्काउंट दिला जाणार आहे. पोलो हाइलाइन प्लस वेरियंटवर 10 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जाणार आहे.
यापूर्वी Volkswagen Nivus Coupe SUV लॉन्च करण्यात आली आहे. याच्या किंमतीबाबत बोलायचे झाल्यास, Coupe SUV ची सुरुवाती किंमत $85,890 डॉलर्स म्हणजेच भारतीय बाजारात याची किंमत जवळजवळ 12 लाख रुपये आहे. कार निर्माता कंपनीने नव्या Nivus ही दोन वेरियंट म्हणजेच Comfortline 200 TSI आणि Highline 200 TSI मध्ये उतरवली आहे. Highline वेरियंटची किंमत $98,290 म्हणजे भारतीय बाजारात याची किंमत 13.8 लाख रुपये आहे.