Uber Auto in Ayodhya: रामलल्लाच्या अभिषेकपूर्वी उबरने अयोध्येत सुरु केली इव्ही ऑटो रिक्षा सेवा
या महिन्याच्या सुरुवातीला, उबरने सेवा वाढवण्यासाठी देशातील अनेक टियर 2 आणि 3 शहरांमध्ये फ्लेक्सिबल किंमतीवर चाचणी सुरू केली, ज्यामुळे रायडर्सना त्यांच्या प्रवासासाठी चालकाशी बोलून भाडे ठरवण्याची संधी मिळू शकते.
Uber Auto in Ayodhya: अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराचा (Ram Temple) अभिषेक कार्यक्रम 22 जानेवारीला होणार आहे. रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेनंतर अयोध्येत येत्या काही महिन्यांत दररोज सुमारे लाखो पर्यटक येतील, असा विश्वास आहे. या विशेष सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनीही शहरात आपला व्यवसाय वाढवण्याची जोरात सुरू केली आहे. अशात राइड-हेलिंग प्लॅटफॉर्म उबर (Uber) ने रविवारी (14 जानेवारी) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत अयोध्येत त्यांच्या उबर ऑटो श्रेणी अंतर्गत इव्ही ऑटो रिक्षा (Electric Auto Rickshaw) सेवेला हिरवा झेंडा दाखवला.
कंपनीने सांगितले की, ते अयोध्येत उबेर इंटरसिटी तसेच परवडणारी कार सेवा उबर गो (Uber GO) देखील सुरू करणार आहे. ही सेवा शहरातील विविध स्थळांशी जोडेल आणि शहरांतर्गत प्रवासाच्या सर्व गरजा पूर्ण करेल.
उबर इंडिया (Uber India) चे अध्यक्ष प्रभजीत सिंग यांनी सांगितले की, ‘या विस्तारामुळे, आम्ही केवळ पर्यटक आणि यात्रेकरूंनाच नव्हे, तर या प्रदेशातील इतर अनेकांनाही गतिशीलतेचे पर्याय उपलब्ध करून देत आहोत.’ सिंग पुढे म्हणाले, ‘आम्ही अयोध्येच्या पर्यटनात योगदान देण्यासाठी, अखंड प्रवासाच्या अनुभवाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शाश्वत आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी वचनबद्ध आहोत.’ सध्या उबर भारतामधील 125 शहरांमध्ये उपलब्ध आहे. (हेही वाचा: Uttarakhand Electric Vehicle Accident: राजाजी राष्ट्रीय उद्यान व्याघ्र प्रकल्पात इलेक्ट्रिक वाहनाचा मोठा अपघात; चार वन अधिकाऱ्यांचा मृत्यू, 4 जण जखमी)
या महिन्याच्या सुरुवातीला, उबरने सेवा वाढवण्यासाठी देशातील अनेक टियर 2 आणि 3 शहरांमध्ये फ्लेक्सिबल किंमतीवर चाचणी सुरू केली, ज्यामुळे रायडर्सना त्यांच्या प्रवासासाठी चालकाशी बोलून भाडे ठरवण्याची संधी मिळू शकते. कंपनीने ही सेवा गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सुरू केली असली तरी, आता त्याचा विस्तार औरंगाबाद, अजमेर, चंदीगड, कोईम्बतूर, डेहराडून, बरेली, ग्वाल्हेर, इंदूर, जोधपूर आणि सुरत अशा इतर शहरांमध्ये करण्यात आला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)