देशातील पहिली TVS कंपनीची इथेनॉलवर चालणारी मोटरसायकल लॉन्च

तर इथेनॉलवर चालणारी ही प्रथम दुचाकी असल्याचे बोलले जात आहे. Apache RTR 200 Fi E100 असे दुचाकीचे नाव आहे.

Apache RTR 200 Fi E100 (Photo Credits-Twitter)

TVS कंपनीने नुकतीच त्यांची इथेनॉलवर (Ethanol) चालणारी मोटरसायकल लॉन्च केली आहे. तर इथेनॉलवर चालणारी ही प्रथम दुचाकी असल्याचे बोलले जात आहे. Apache RTR 200 Fi E100 असे दुचाकीचे नाव आहे. टीव्हीएसच्या या बाईक लॉन्च वेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, टीव्हीएस अध्यक्ष वेणू श्रीनिवासन आणि नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांच्या हस्ते या नव्या दुचाकीचा उद्घाटन सोहळा पार पडला.

ग्राहकांना ही इथेनॉलवर चालणारी दुचाकी खरेदी करण्यासाठी 1 लाख 20 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. तर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक येथे सव्वा लाख रुपयापर्यंत ग्राहकांना खरेदी करता येणार असून त्यांच्यासाठी एक स्पेशल अॅडशन या दुचाकीसाठी देण्यात आले आहे. टीव्हीएस कंपनीचा Apache हा प्रमुख ब्रँन्ड असून त्याचे जगभरातून 3.5 मिलियनपेक्षा जास्त ग्राहक आहेत.

इथेनॉलनवर चालणारी ही अपाची ब्रँन्डची ही दुचाकी भारतात हरित भवितव्य निर्माण करणार असल्याची आशा श्रीनिवासन यांनी व्यक्त केली आहे. तर इथेनॉल हे विषारी नसून त्याची हाताळणी, साठवण किंवा वाहतूक या सर्व प्रकारे सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र सध्या पेट्रोलमध्ये 10-20 टक्के इथेनॉल्स मिसळले जाते.

(Harley Davidson ची सर्वात स्वस्त बाइक; Royal Enfield Bullet ला देणार जबरदस्त टक्कर)

टीव्हीएसच्या या नव्या मॉडेलच्या दुचाकीसाठी ट्वीन स्प्रे ट्वीन पोर्ट ईएफआय तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. तसेच 8500 आरपीएमला 21 पीएस आणि 700 टॉर्क निर्माण करु शकणार आहे. त्याचसोबत प्रतितास ही दुचाकी 129 किमी अंतर पार करु शकणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif