अधिक पॉवरफुल असणारी TVS Jupiter 125 लवकरच होणार लॉन्च, जाणून घ्या खासियत

भारतात सर्वाधिक प्रमाणात विक्री केली जाणारी TVS Jupiter लवकरच त्यांची अधिक पॉवरफुल असणारी स्कूटर TVS Jupiter 125 लॉन्च करणार आहे.

टीवीएस ज्युपिटर (Photo Credits-Twitter)

भारतात सर्वाधिक प्रमाणात विक्री केली जाणारी TVS Jupiter लवकरच त्यांची अधिक पॉवरफुल असणारी स्कूटर TVS Jupiter 125 लॉन्च करणार आहे. जी सध्याच्या टीवीएस ज्युपिटर पेक्षा अधिक स्पोर्टी आणि पॉवरफुल असणार आहे. सध्या भारतात TVS Jupiter 110 सीसी वेरियंट असून कंपनीने आधीच सांगितले होते की, ज्युपिटर 125 सीसी वेरियंटमध्येच लॉन्च केले जाणार आहे. नवी ज्युपिटर ही पुढील 3-4 महिन्यात उतरवली जाईल अशी अपेक्षा आहे.(TVS पुढील वर्षात Zeppelin, Apache RTR 310 सह काही धमाकेदार बाइक-स्कूटर करणार लॉन्च)

सध्या भारतात 125cc स्कूटर सेगमेंट मधील टीवीएसचीच स्कूटर Ntorq 125 आहे. जी आपल्या स्पोर्टी लूक आणि डिझाइनच्या कारणामुळे तरुणांमध्ये पॉप्युलर आहे. मात्र ज्या लोकांना उत्तम मायलेज आणि सिंपलसह मजबूत स्कूटर खरेदी करायची आहे त्यांच्यासाठी ही योग्य आहे. आता कंपनीने त्यांनी बेस्ट सेलिंग स्कूटर अधिक पॉवरफुल वेरियंटमध्ये लॉन्च करणार आहे. ज्यामुळे लोक अधिक आकर्षित होतील. TVS Jupiter 125 ची टक्कर इंडियन मार्केटमध्ये पॉप्युलर स्कूटर Honda Activa 125, Hero Destini 125 आणि Suzuki Access 125 सोबत होणार आहे.

TVS Jupiter मध्ये 124.8cc चे इंजिन दिले जाणार आहे. जे 9.38PS ची पॉवर आणि 10.5 Nm चे मॅक्सिमम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असणार आहे. सध्या ज्युपिटर इंडियन मार्केटमध्ये उपलब्ध आहे. त्यामध्ये 109.7cc चे इंजिन दिले असून 7.47 PS ची पॉवर आणि 8.4 Nm चा टॉर्क जनरेट करणार आहे. या स्कूटरच्या विविध वेरियंटची किंमत 62,577 ते 70,802 रुपयांदरम्यान असणार आहे.