Toyota Fortuner TRD लिमिटेड Edition भारतात लॉन्च, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

Toyota ने भारतीय बाजारात त्यांची पॉप्युलर एसयुव्ही Fortuner चे स्पेशल अॅडिशन (Toyota Fortuner TRD Limited Edition) लॉन्च केली आहे. टोयोटा फॉर्च्युनर टीआरडी फक्त डिझेल आणि दोन वेरियंट्समध्ये बाजारात उतरवली आहे.

Toyota Fortuner TRD (Photo Credits-Twitter)

Toyota ने भारतीय बाजारात त्यांची पॉप्युलर एसयुव्ही Fortuner चे स्पेशल अॅडिशन (Toyota Fortuner TRD Limited Edition) लॉन्च केली आहे. टोयोटा फॉर्च्युनर टीआरडी फक्त डिझेल आणि दोन वेरियंट्समध्ये बाजारात उतरवली आहे. याची किंमत 34.98 लाख आणि 36.88 लाख रुपये आहे.  कंपनीची डिलरशीपवर या स्पेशल टोयोटा फॉर्च्युनरची बुकिंग सुरु करण्यात आली आहे.  फॉर्च्युनर टीआरडी अॅडिशन हे टोयोटा रेसिंग डेव्हलपमेंटने  डिझाइन केले आहे. फॉर्च्युनरच्या स्टँडर्ड मॉडेलच्या तुलनेत टीआरडी अॅडिशनचे लूक अधिक स्पोर्टी आहे. त्याचसोबत यामध्ये काही नवे फिचर्स सुद्धा दिले आहेत.

स्पेशल अॅडिशन मॉडेलवर टीआरडी बैजिंग आणि रग्ड चारकोल ब्लॅक R18  अलॉय वील्ज दिले आहेत. ड्यूल-टोन रुफ आणि पर्ल व्हाइट ड्युल-टोन कलर स्किम याचा स्पोर्टी लूक अधिक वाढवतो. या व्यतिरिक्त फॉर्च्युनर टीआरडी मध्ये LED DRL सह बाय-बीम LED प्रोजेक्टर हेडलॅम्प, LED फॉग लॅम्प्स, रियर कॉम्बिनेशन लॅम्प्स, क्रोम प्लेटेड डोर हँडल्स आणि विंडो बेल्टलाइन दिले आहे. (Honda CBR1000RR-R फायरब्लैड आणि SP वेरियंटमधील बाईकची भारतात बुकिंग सुरु, जाणून घ्या फिचर्स)

फॉर्च्युनरच्या रेग्युलर मॉडेलच्या तुलनेत Fortuner TRD मध्ये काही अतिरिक्त फिचर्स दिले आहेत. या मध्ये ऑटो फोल्ड ORVN, अॅल्युमिनेटेड स्कफ प्लेट आणि 360 पॅनारॅमिक व्हू मॉनिटर मिळणार आहे. यासोबत एसयुवी मध्ये नेविगेशन टर्न डिस्प्लेसह मोठा TFT मल्टी इन्फर्मेशन डिस्प्लस 8-वे ड्रायव्हर अॅन्ड पॅसेंजर सीट, रियर एसी वेंट्ससह ऑटोमेटिक क्लायमेट कंट्रोल, 6 स्पीकर्ससह टचस्क्रिन ऑडिओ सिस्टिम, स्टिअरिंग व्हिल माउंटेड कंट्रोल्स आणि क्रुझ कंट्रोल सारखे फिचर्स दिले आहेत.

सेफ्टीबाबत बोलायचे झाल्यास जो Toyota Fortuner TRD अॅडिशनमध्ये 7 एअरबॅग्स, ब्रेक असिस्टसह व्हेईकल स्टेबिलिटी कंट्रोल, दुसऱ्या लाईनमध्ये Isofix आणि टीथर अँकर, हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल, एबीएस, ईबीडी, आपत्कालीन ब्रेक सिग्नल आणि आपत्कालीन  अनलॉकसह स्पीड ऑटो लॉक फिचर्स सुद्धा देण्यात आलेले आहेत. फॉर्च्युनर टीआरडी अॅडिशनमध्ये 2.8 लीटर, 4 लीटर डिझेल इंजिन असून जे 177PS ची पॉवर आणि 450Nm टॉर्क जनरेट करणार आहे. इंजिन-6 स्पीड ऑटोमेटिक गिअरबॉक्स लैस आहे. एसयुव्ही 2 व्हिल ड्राईव्ह आणि 4 व्हिल ड्राईव्ह ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now