IPL Auction 2025 Live

Hatchback Cars 2020: यावर्षी भारतात लॉन्च होतील या पाच उत्कृष्ट हॅचबॅक कार; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

आता कंपन्या ज्या प्रकारे हॅचबॅक मोटारींवर काम करत आहेत, ते पाहता अशा वाहनांची क्षमता लक्षणीय वाढली असल्याचे दिसून येत आहे.

New Elite i20 by Hyundai (Photo Credits: Twitter/ ASHISH MASIH)

भारतात रस्त्यांवर ज्या प्रकारे गर्दी असते, ते पाहता प्रवासासाठी हॅचबॅक वाहने (Hatchback Cars) अधिक चांगली मानली जातात. पण एक वेळ असा होता की, हॅचबॅकसह खूप दूर प्रवास करणे शक्य नाही असे वाटत होते. आता कंपन्या ज्या प्रकारे हॅचबॅक मोटारींवर काम करत आहेत, ते पाहता अशा वाहनांची क्षमता लक्षणीय वाढली असल्याचे दिसून येत आहे.

2019 मध्ये ह्युंदाई ग्रँड आय 10 आणि टोयोटा ग्लान्झा (Toyota Glanza) सारख्या हॅचबॅक मोटारी बाजारात आल्या. आता यावर्षी कोणत्या हॅचबॅक कार लॉन्च केल्या जाऊ शकतील याबाबत आम्ही माहिती देत आहोत.

ह्युंदाई एलिट i20 (Hyundai Elite i20) -

2020 मध्ये ह्युंदाई कंपनी आपल्या कारमध्ये बरेच बदल करणार आहे. अशी अपेक्षा आहे की, बदलांनंतर हूडाई एलिट आय 20 मध्ये एक नवीन कॅसकेडिंग ग्रिल आणि नवीन एलईडी हेडलॅम्प्स आणि टेललाईट्स मिळतील. समोरून ही गाडी नुकतेच बाजारात आलेल्या ह्युंदाई फेसलिफ्टसारखी दिसेल. या कारमध्ये बीएस -6 कम्प्लायंट 1.5 लिटर डिझेल आणि 1.2 लीटर पेट्रोल इंजिन असेल. यावर्षी ही गाडी बाजारात येऊ शकते.

मारुती सुझुकी सेलेरिओ (Maruti Suzuki Celerio) -

5 वर्षांपूर्वी लॉन्च झालेले, मारुती सेलेरिओचे फेसलिफ्ट मॉडेल यावर्षी लॉन्च केले जाऊ शकते. मारुतीच्या इतर हलक्या मोटारींप्रमाणेच यातही हलका हार्टेक्ट प्लॅटफॉर्म वापरला जाण्याची शक्यता आहे.

मारुती सुझुकी इग्निस फेसलिफ्ट (Maruti Suzuki Ignis Facelift) -

सुमारे दोन वर्षांपूर्वी लाँच झालेल्या मारुती सुझुकी इग्निसचे फेसलिफ्ट मॉडेल यावर्षीही बाजारात येऊ शकते. अलीकडेच या फेसलिफ्ट मॉडेलचे अनेक फोटो समोर आले. फ्रंट ग्रिलमध्ये इग्निसमध्ये नवीन ग्रिल आहे, जी यापूर्वी एस-प्रेसो मायक्रो एसयूव्हीमध्ये दिसली होती. याशिवाय नवीन फॉग लॅम्पसह नवीन डिझाईन बम्परही उपलब्ध असतील. स्विफ्ट आणि बॅलेन्समध्ये वापरण्यात आलेले 1.2 लीटर पेट्रोल इंजिन या इग्निसमध्येही वापरले जाण्याची अपेक्षा आहे.

टाटा अल्ट्रोज (Tata Altroz) -

टाटा अल्ट्रोज ही प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमधील कंपनीची पहिली कार आहे. ही गाडी पेट्रोल आणि डिझेल पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. यामध्ये रेवोट्रॉनचे 1.2 लीटर बीएस -6 थ्री सिलिंडर इंजिन वापरण्यात येणार आहे, जे 86 पीएस आणि 113 एनएम टॉर्क जनरेट करेल. दुसरीकडे डिझेल इंजिनमध्ये चार सिलिंडर 1.5 लिटर बीएस -6 रेवोट्रॅक इंजिन असेल, जे 19 पीएस आणि 200 एनएम टॉर्क जनरेट करेल. (हेही वाचा: 74 लाखाची कार आणि 7 कोटी रुपये जिंकण्याची संधी; फक्त करावे लागेल एक काम, जाणून घ्या ऑफर)

टाटा टियागो फेसलिफ्ट (Tata Tiago Facelift) -

टाटा यावर्षी टियागोचे सर्वोत्कृष्ट फेसलिफ्ट मॉडेल बाजारात घेऊन येण्याची अपेक्षा आहे. या गाडीमध्ये अनेक स्टाईलिंग आणि नवीन वैशिष्ट्ये समाविष्ट केली जाऊ शकतील. लवकरच ही कार सर्व क्रॅश चाचण्या आणि पादचारी सुरक्षा नियम पूर्ण करेल, त्यानंतर ती बाजारात दाखल होईल.



संबंधित बातम्या