IPL Auction 2025 Live

टाटा मोटर्स लवकरच घेऊन येणार Tata Punch च्या अॅडिशनल वर्जनमधील 'ही' कार, आयपीलए 2022 मध्ये झळकवणार

ही कार येत्या आयपीएल 2022 च्या सीझनमध्ये झळकवली जाणार आहे. कार निर्मात्यांनी पंचच्या नव्या काजीरंगा वेरियंट (Kaziranga Variant) चा व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत.

New Tata PUNCH Kaziranga Edition (Photo Credits-Twitter)

टाटा मोटर्सने आपल्या न्यू एसयुवी पंचच्या वन ऑफ वेरियंटची घोषणा केली आहे. ही कार येत्या आयपीएल 2022 च्या सीझनमध्ये झळकवली जाणार आहे. कार निर्मात्यांनी पंचच्या नव्या काजीरंगा वेरियंट (Kaziranga Variant) चा व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. ही गा कार आसाम मधील काजीरंगा राष्ट्रीय उद्यात आढळून येणाऱ्या एक शिंगी गेंड्यापासून प्रेरित आहे. टाटा मोटर्स यंदाच्या आयपीएलसाठी स्पॉनरशिप देणार आहे.

कंपनी वन ऑफ पंचचे उत्पादन करणार आहे. जी टॉप-स्पेक क्रिएटीव्ह ट्रिमवर आधारित असण्याची शक्यता आहे. शेअर करण्यात आलेल्या फोटोनुसार  टाटा पंच मधील  स्पेशल वेरियंट कार शानदार कलर ऑप्शनसह येण्याची शक्यता आहे. दरम्यान, कारचा बाहेरील लूक आणि डिझाइन टाटा पंचच्या रेग्युलर मॉडेलप्रमाणे दिसणार आहे. यामध्ये काही कॉस्मेटिक बदल केले जाऊ शकतात. टाटा पंचचे स्पेशल अॅडिशन वेरियंट एक विशेष राइनो बॅजसह येणार आहे. जे रियर विंडस्क्रिन आणि ग्लोवबॉक्सच्या आतमध्ये ठेवले गेले आहे.(TVS Jupiter 125 च्या सर्व मॉडेलच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या अधिक)

Tweet:

टाटा मोटर्सने गेल्या वर्षात ऑक्टोंबर महिन्यात पंच सब कॉम्पॅक्ट एसयुवी लॉन्च केली होती. कार निर्माता पंचला चार ट्रिम्समध्ये झळकवणार आहेत. ज्यामध्ये अॅडवेंचर, एक्स्म्प्लिश्ड आणि क्रिएटव्हचा समावेश असणार आहे. या कारची सुरुवाती किंमत 5.64 लाख रुपये आहे. तर याची टॉप मॉडेलची किंमत 8.98 लाख रुपयांपर्यंत असू शकते. गेल्या वर्षात ग्लोबल एनसीएपी द्वारे करण्यात आलेल्या क्रॅश टेस्टमध्ये पंचला फाइव्ह स्टार रेटिंग मिळाल्यानंतर ती भारताच्या रस्त्यांवर सुरक्षितपणे धावण्यास सक्षम आहे.

कंपनीच्या या कारबद्दल बोलायचे झाल्यास इंजिन बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये 1.2 लीटर 3 सिलेंडर नॅच्युरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनसह येणार आहे. जे 6000rpm वर 85bhp आणि 3300 वर 113Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. गिअरबॉक्सबद्दल अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.