भारतामध्ये लॉन्च झाली Tata Punch iCNG; जाणून घ्या व्हेरियंट्स, किंमत व फीचर्स

तर CNG मोडवर, हे इंजिन 73.4 bhp आणि 103Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

Tata Punch iCNG (Photo Credits: Tata Motors)

टाटा मोटर्सने एकामागून एक उत्तम उत्पादने सादर करून सीएनजी (CNG) कार बाजारात खळबळ उडवून दिली आहे. यापूर्वी Altroz ​​iCNG लाँच केल्यानंतर टाटाने आता Punch iCNG लाँच केली आहे. टाटा मोटर्सने शुक्रवारी ट्विन सिलिंडर तंत्रज्ञान असलेल्या तीन कार लाँच केल्या. सनरूफ तसेच उत्तम सुरक्षा फीचर्स आणि अधिक बूट स्पेस असलेल्या या CNG SUV ची सुरुवातीची किंमत नुकत्याच लाँच झालेल्या Hyundai Xtor CNG पेक्षा कमी आहे. Punch iCNG सोबत, टाटाने अद्ययावत Tiago CNG आणि Tigor iCNG देखील त्यांच्या विद्यमान लाइनअपमध्ये सादर केले आहे.

टाटा ने ही कार ट्विन सिलेंडर तंत्रज्ञानासह सादर केली आहे, ज्यातील प्रत्येकाची क्षमता 30 लिटरपर्यंत आहे. हे दोन्ही सिलिंडर लगेज एरियाखाली ठेवण्यात आले आहेत आणि तरीही तेथे 210 लीटर जागा उपलब्ध आहे. या कारमध्ये मायक्रो स्वीच देण्यात आला आहे. सीएनजी टाकत असताना कार बंद ठेवण्यासाठी मायक्रो-स्विच देण्यात आला आहे. यासोबतच याला थर्मल इन्व्हेंट प्रोटेक्शन मिळाले आहे, ज्यामुळे काही गडबड झाल्यास ते आपोआप बंद होते आणि सिलिंडरमधून गॅस आपोआप बाहेर येतो.

यात व्हॉइस असिस्टेड इलेक्ट्रिक सनरूफ, फ्रंट सीट आर्मरेस्ट, यूएसबी सी टाइप चार्जर आणि शार्क फिन अँटेना मिळतो. याशिवाय ऑटोमॅटिक प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी डीआरएल, 16-इंच डायमंड कट अलॉय व्हील्स, हरमन 7-इंच इंफोटेनमेंट सिस्टम, अॅन्ड्रॉईड, ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटी, रेन सेन्सिंग वायपर्स, अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट देखील आहेत. (हेही वाचा: Hummer H1 'X3' Viral Video: दुबईतील अब्जाधीश शेख हमाद यांच्या हमरचा व्हिडिओ व्हायरल; नेहमीच्या मॉडेलपेक्षा 3 पट मोठा आहे आकार)

किंमत-

टाटा पंच प्युअर सीएनजी व्हेरियंट एक्स शोरूम किंमत- रु 7,09,900

टाटा पंच अॅडव्हेंचर सीएनजी व्हेरियंट एक्स शोरूम किंमत- रु 7,85,9,900

टाटा पंच अॅडव्हेंचर रिदम सीएनजी व्हेरियंट एक्स शोरूम किंमत - रु 8,19,900

टाटा अनकॉमची एक्स शोरूम सीएनजी व्हेरियंट एक्स शोरूम किंमत- रु 8,84,900

Tata Punch Accomplished Dazzle S CNG व्हेरियंट एक्स शोरूम किंमत- रु. 9,67,900

पंचमध्ये 1.2-लिटर पेट्रोल इंजिन आहे, जे 86 bhp पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करते. तर CNG मोडवर, हे इंजिन 73.4 bhp आणि 103Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. पंच ही भारतातील पहिली परवडणारी सीएनजी कार आहे. सध्या मारुती सुझुकी आणि ह्युंदाई मोटर्सचे भारतीय बाजारपेठेत फॅक्टरी फिट सीएनजी कारचे वर्चस्व आहे. आता टाटाच्या सीएनजी गाड्या त्यांना मोठे आव्हान देत आहेत.

(टीप- ही बातमी इंटरनेट आधारित माहितीवर लिहिण्यात आली आहे. यातील दाव्याची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही. गाड्यांचे फीचर्स व किंमतीबाबत अधिकृत संकेतस्थळा भेट द्या.)