सिंगल चार्जमध्ये 400 किमीची जबरदस्त रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक XUV, भारतात लवकरच होणार लॉन्च

भारतात इलेक्ट्रिक गाड्यांसाठी काहीच ऑप्शन आहेत. मात्र एखाद्याला जर ही गाडी खरेदी करायची असेल तर त्यासाठी अधिक वेळ लागत नाही.

Mahindra eXUV300 (Photo Credits-Twitter)

भारतात इलेक्ट्रिक गाड्यांसाठी काहीच ऑप्शन आहेत. मात्र एखाद्याला जर ही गाडी खरेदी करायची असेल तर त्यासाठी अधिक वेळ लागत नाही. इलेक्ट्रिक कारच्या ऑप्शन बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये ह्युंदाईची Kona Electric SUV, MG ची ZD EV सह Tata Motors यांची Nexon Electric चा समावेश आहे. यामधील कार ग्राहकांना खरेदी करण्यासाठी निवडावी लागते. या इलेक्ट्रिक कार व्यतिरिक्त आता लवकरच मार्केटमध्ये महिंद्राची इलेक्ट्रिक एसयुवीची एन्ट्री होणार आहे.

तर Mahindra eXUV300 कंपनीची लोकप्रिय आणि अत्यंत सुरक्षित एसयुवी XUV 300 वर आधारित असणार आहे. कंपनीने या एक्सयुवीची सफलता पाहता इलेक्ट्रिक मध्ये एन्ट्री करण्यासाठी लवकरच exXUV 300 भारतीय मार्केटमध्ये उतरवली जाणार आहे. ही कार ऑटो एक्सपो 2020 मध्ये झळकवण्यात आली आहे. ही एक स्टाइलिश इलेक्ट्रिक एक्सयुवी असणार आहे. जी सिंगल चार्जमध्ये 375-400 किमी अंतर कापण्यास सक्षम आहे. तर Mahindra eXUV300 ही कंपनीची पॉप्युलर सब-कॉम्पॅक्ट एसयुवीचे इलेक्ट्रिक अवतार आहे. डिझाइन बद्दल बोलायचे झाल्यास ती XUV300 सारखीच असणार आहे. त्याचसोबत डिझाइनमध्ये काही अपडेट्स सुद्धा केले जाणार आहेत.(नवी Ford Ecosport ऑक्टोंबर मध्ये होऊ शकते लॉन्च, पहायला मिळणार काही खास बदल)

तर महिंद्राची eKUV100 मध्ये 15.9 किलोवॅटचे लिक्विड कूल्ड मोटार लावण्यात आले आहे. जे 54Ps ची पॉवर आणि 120Nm चा टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, पॉवरफुल बॅटरीमुळेच ही कार जवळजवळ 147 किमी रेंज पार करु शकते. कारच्या फास्ट चार्जिंग फिचरच्या कारणामुळे 80 टक्के टक्के चार्ज होण्यास यासाटी 50 मिनिटांचा कालावधी लागतो. याची किंमत 8-9 लाख रुपयांदरम्यान असू शकते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now