Micromax सहसंस्थापकांनी सादर केली भारतातील पहिली Artificial intelligence इलेक्ट्रिक बाइक; 1000 मध्ये करा बूक, जाणून घ्या वैशिठ्ये
कंपनी रेव्हॉल्ट मोटर्स (Revolt Motors) ने भारतात ही आरव्ही 400 इलेक्ट्रिक बाइक लॉन्च केली आहे. कंपनीच्या मते, ही भारतातील पहिली आर्टिफिशिल इंटेलिजेंस (AI) मोटारसायकल आहे. ही गाडी आपण 25 जून 2019 पासून प्रीबुक करू शकाल.
मायक्रोमॅक्सचे (Micromax) सहसंस्थापक राहुल शर्मा यांनी काल, 18 जून रोजी भारतातील पहिली एआय इलेक्ट्रिक बाईक (Electric Bike) सादर केली. चीनी स्मार्टफोन कंपन्यांच्या स्पर्धेत अयशस्वी झाल्यानंतर, आता मायक्रोमॅक्स कंपनी ऑटो (Auto) क्षेत्रात आपले नशीब अजमावत आहेत. कंपनी रेव्हॉल्ट मोटर्स (Revolt Motors) ने भारतात ही आरव्ही 400 इलेक्ट्रिक बाइक लॉन्च केली आहे. कंपनीच्या मते, ही भारतातील पहिली आर्टिफिशिल इंटेलिजेंस (AI) मोटारसायकल आहे. ही गाडी आपण 25 जून 2019 पासून प्रीबुक करू शकाल.
राहुल शर्माने यापूर्वी एप्रिलमध्ये रिव्हॉल्ट कंपनीसह मोबिलिटी इंडस्ट्री मध्ये पाऊल टाकण्याची घोषणा केली होती. या इलेक्ट्रिक बाईकवर कंपनी 2 वर्षे काम करीत आहे. कंपनीच्या मते ही बाईक नेक्स्ट जनरेशन मोबिलिटी सॉल्युशनद्वारे लोकांना क्लीन कम्यूट प्रदान करेल. रिव्हॉल्ट मोटर्सने बॅंगलोरबेज्ड स्टार्टअप एथर एनर्जीसह (Ather Energy) ही बाईक शेअर केली आहे. एथर एनर्जी आपल्या दोन इलेक्ट्रिक Ather 450 आणि Ather 340 साठी लोकप्रिय आहेत.
ही बाइक अमेझॉन आणि रेवॉल्टच्या वेबसाइटवरुन 1000 रूपयांमध्ये प्रीबुक केली जाऊ शकते. सध्या जरी ही बाइक सुरुवातीला दिल्लीत उपलब्ध असली तरी, नंतर ही बाइक एनसीआर, पुणे, बेंगलुरू, हैदराबाद, नागपूर, अहमदाबाद आणि चेन्नई येथे उपलब्ध केली जाणार आहे. जुलै 2019 पासून या बाइकचे वितरण सुरू होईल. आरव्ही 400 मध्ये आपल्याला एलईडी लाइटिंग, पूर्ण डिजिटल डॅश, 4 जी कनेक्टिव्हिटी आणि इतर अनेक वैशिष्ट्ये मिळणार आहेत. (हेही वाचा: आता ना टायर पंक्चर होण्याची भीती, ना हवा भरण्याची कटकट; कारण बाजारात येत आहे Airless Tires)
कंपनीचा दावा आहे की बाइकची रेंज 156 किलोमीटर आहे. कंपनीने या वर्षात 1.20 लाख युनिट्सच्या निर्मितीचे लक्ष्य निश्चित केले आहे. रेव्हॉल्ट आरव्ही 400 बद्दल बोलायचे झाले तर, या गाडीत आपल्याला कॉम्पॅक्ट डिझाइन, इंजिनऐवजी बॅटरी पॅक मिळेल. त्यात तुम्हाला युएसडी फॉर्क, मोनो शॉक आणि डिस्क ब्रेक मिळेल. रेव्हॉल्ट आरव्ही 400 चा टॉप स्पीड 85 किलोमीटर प्रति तास आहे. बाइक चार्ज करण्यासाठी कंपनीचे मोबाइल स्ॅप स्टेशन आहे, जे आपण अॅप द्वारे ट्रॅक करू शकता. रिव्हॉल्ट आरव्ही 400 ही बाईक रेबेल रेड आणि कॉस्मिक ब्लॅक अशा दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)