Renault Kinger भारतात उद्या झळकवली जाणार, शानदार स्टाइल आणि फिचर्ससह 5 लाख रुपये किंमत असण्याची शक्यता

फ्रान्सची (France) वाहन निर्माती कंपनी रेनॉल्ट (Renault) उद्या आपली बहुप्रतिक्षित एसयुवी Kiger अधिकृतरित्या झळकवणार आहे. जी येत्या महिन्यात भारतात अधिकृत पद्धतीने लॉन्च केली जाणार आहे.

Renault Kinger भारतात उद्या झळकवली जाणार, शानदार स्टाइल आणि फिचर्ससह 5 लाख रुपये किंमत असण्याची शक्यता
Renault Kiger (Photo Credits-Twitter)

फ्रान्सची (France) वाहन निर्माती कंपनी रेनॉल्ट (Renault)  उद्या आपली बहुप्रतिक्षित एसयुवी Kiger अधिकृतरित्या झळकवणार आहे. जी येत्या महिन्यात भारतात अधिकृत पद्धतीने लॉन्च केली जाणार आहे. देशात Kia Sonet, Tata Nexon आणि Ford Ecosport ला टक्कर देणार आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, किगर नुकत्याच लॉन्च निसान मॅग्नाइटच्या प्लॅटफॉर्मवर तयाक केली जाणार आहे. ही कॉम्पॅक्ट एसयुवी बहुतांश वेळी परीक्षणावेळी दिसली आहे. परंतु याच्या डिझाइन संदर्भात अधिकृत अधिक माहिती समोर आलेली नाही.

कारच्या डिझाइन बद्दल बोलायचे झाल्यास स्कल्पट टेलगेट, एक आकर्षक सी आकरचे एलईडी टेल लॅम्प क्लस्टर, रिफ्लेक्टरसह हाय माउंट स्टॉप लॅम्प, टेलगेट माउंटेड स्पॉइलर, वायपर आणि बंम्पवर दिला जाईल. त्याचसोबत पुढील बाजूस ब्लॅक बंम्पर क्लॅडिंग, 16 इंचाचा अलॉय व्हिल, ब्लॅक बी. पीलर आणि रेग्युलर पुल टाइप डोस हँडल दिला जाऊ शकतो.(Car Buying Guide: नव्या कारच्या डिलिव्हरी पूर्वी जरुर तपासून पहा 'या' गोष्टी अन्यथा होईल मोठे नुकसान)

रेनॉल्ट किगरच्या प्रमुख डिझाइनसाठी क्लेमशेल शेप्ड बोनेट, स्प्लिट हेडलॅम्प क्लस्टर, एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स, वाइड एअर इनटेक आणि ग्रील सेक्शन दरम्यान रेनॉल्टच्या बँजिंग पहाता येणार आहेत. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ही एक साधारण लूक ऐवजी स्पोर्टी लूक लैस असणार आहे.(MG ने लॉन्च केली MG Hector फेसलिफ्ट, फिचर्ससह पॉवर संबंधित Creta ला देणार टक्कर)

कारच्या इंटिरियरमध्ये डुअलर टोन कलर स्किम दिला जाणार आहे. यामध्ये Apple Car Play आणि Android Auto कनेक्टिव्हिटीसाठी डॅशबोर्ड असणारा आठ इंचाचा टचस्क्रिन इंन्फोटेनमेंट सिस्टिम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, क्रुज कंट्रोल, पुश बटण स्टार्ट व स्टॉप बटण, माउंटेड कंट्रोल्ससह मल्टी फंक्शनल स्टिअरिंग व्हिल यांचा समावेश असणार आहे.तसेच नॅच्युरल एस्पिरेटेड 1.0 लीटर तीन सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिनचा उपयोग केला जाणार आहे. अशी अपेक्षा आहे की, याच्या टॉप अॅन्ड वेरियंटमध्ये कंपनी सीवीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देईल. सध्या किंमती बद्दल दावा करणे मुश्किल आहे पण सुरुवाती किंमत 5 लाख असण्याची शक्यता आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 27, 2021 04:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).