धमाकेदार फिचर्ससह लवकरच लॉन्च होणार Royal Enfield ची नवी मोटरसायकल, स्मार्टफोनला ही कनेक्ट करता येणार
त्यामुळे आपल्या ग्राहकांना उत्तम रायडिंग एक्सपीरियंस मिळावा यासाठी कंपनीकडून प्रयत्न केला जातो. कंपनीच्या बाइक्स भारतात अत्यंत लोकप्रिय आहेत.
Royal Enfield सातत्याने आपल्या मोटरसायकलमध्ये बदल करते. त्यामुळे आपल्या ग्राहकांना उत्तम रायडिंग एक्सपीरियंस मिळावा यासाठी कंपनीकडून प्रयत्न केला जातो. कंपनीच्या बाइक्स भारतात अत्यंत लोकप्रिय आहेत. दरम्यान 2021 मध्ये सुद्धा कंपनी आपल्या बाइकमध्ये बदल करणार आहे. ज्यामुळे ग्राहकांना आपल्या गंतव्य स्थानकापर्यंत पोहण्याच मदत होणार आहे. रॉयल एनफिल्डचे हे हायटेकचे टर्न बाय टर्न नेविगेशन सिस्टिम फिचर हे अत्यंत फ्युचरिस्टिक आहे.(Ducati Multistrada 950 S 'GP White' भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह फिचर्स)
कंपनी आपल्या अपकमिंग बाइक्समध्ये स्पीडोमीटरसह एक ट्रिपर डिस्प्ले सुद्धा देणार आहे. ज्यामध्ये तुम्ही नेविगेशन करु शकता. हा डिस्प्ले टर्न बाय टर्न डायरेक्शन दाखवणार आहे. त्याचसोबत अॅडवेंचर करण्यासाठी उत्फुर्त असलेल्या ग्राहकांसाठी हे फिचर्स अत्यंत उपयोगी आणि त्यांच्या पसंदीस पडणार आहे. आज आम्ही तुम्हाला याच बद्दल अधिक माहिती देणार आहोत.
2021 Himalayan ही बाइक बहुतांश वेळा स्पॉट करण्यात आली आहे. तर लवकरच ती भारतात लॉन्च केली जाणार आहे. यामध्ये ग्राहकांना कंपनी ट्रिपर टर्न बाय टर्न नेविगेशन सिस्टिम देणार आहे. खरंतर अॅडवेंचर ग्राहकांमध्ये ही बाइक लोकप्रिय आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार ही बाइक तीन रंगात उतरवली जाणार आहे.(Automatic Hybrid Tractor: भारतामध्ये Proxecto ने सादर केला देशातील पहिला ऑटोमॅटिक हायब्रिड ट्रॅक्टर; ना गियर ना क्लच, जाणून घ्या वैशिष्ठ्ये आणि किंमत)
रॉयल इन्फिल्ड कंपनीची 2021 Interceptor 650 चे अपेडेटेड मॉडेल वर्षाअखेरी पर्यंत मार्केट मध्ये उतरवले जाऊ शकते. मोटरसायकलमध्ये डिझाइनच्या अपडेटसग फिचर्समध्ये ही अपडेट करण्यात येणार आहे. ज्यामध्ये ट्रिपरचा सुद्धा समावेश आहे. ट्रिपर फिचर दिल्यानंतर मोटरसायकल चालवणाऱ्यांना उत्तम अनुभव मिळणार आहे. तसेच Royal Enfield Classic 350 ही कंपनीची अत्यंत लोकप्रिय मोटरसायकल आहे. मात्र नव्या रुपात येत्या काही काळात ती लॉन्च केली जाणार आहे.यामध्ये ट्रिपर ऑफर केला जाणार आहे.