IPL Auction 2025 Live

Ola Electric Car: ओला लॉन्च करणार इलेक्ट्रिक कार; 'अशी' आहे Concept Design, जाणून घ्या सविस्तर

भाविश अग्रवाल यांनी जारी केलेला टीझर फोटो या कॉन्सेप्ट कारचा आहे.

Ola Electric Car (PC - Twitter)

Ola Electric Car: ओला इलेक्ट्रिक (Ola Electric) सीईओ भाविश अग्रवाल यांनी ट्विटरवर ओलाच्या आगामी इलेक्ट्रिक कारचा टीझर फोटो शेअर केला आहे. इलेक्ट्रिक कार आगामी ओला ई-कारच्या डिझाइन संकल्पनेसारखी दिसते, जी एक स्टाइलिश बॅटरी-इलेक्ट्रिक हॅचबॅक असेल. ओलाच्या सीईओने सोमवारी संकेत दिल्यानंतर राइड-शेअरिंग स्टार्टअप-ईव्ही मेकर लवकरच इलेक्ट्रिक कारची निर्मिती करणार असल्याचे संकेत दिले आहे.

एका ट्विटला उत्तर देताना अग्रवाल यांनी सोमवारी लिहिले की, ज्या व्यक्तीने Tata Nexon EV आणि Ola S1 ई-स्कूटर खरेदी केली आहे तो पुढे Ola इलेक्ट्रिक कार खरेदी करेल. भाविश अग्रवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "पुढील कार ओला इलेक्ट्रिक कार असावी." (वाचा -

दरम्यान, राइड-शेअरिंग सर्व्हिस एग्रीगेटर स्टार्टअपने भारतीय बाजारपेठेत अनेक वर्षे प्रस्थापित केल्यानंतर गेल्या वर्षी ईव्ही उत्पादन व्यवसायात प्रवेश केला. याने ओला S1 आणि S1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटर्स लाँच केल्या, ज्या भारतात बनवल्या गेल्या आहेत आणि त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता, कंपनीने इलेक्ट्रिक कारच्या सेगमेंटमध्येही फायदा मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ओला सीईओने यापूर्वी सांगितलं होतं की, कंपनी 2023 पर्यंत त्यांची इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ओला इलेक्ट्रिकच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, इलेक्ट्रिक कारसाठी काम गांभीर्याने सुरू आहे. भाविश अग्रवाल यांनी जारी केलेला टीझर फोटो या कॉन्सेप्ट कारचा आहे. अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, "सध्याची फ्युचरफॅक्टरी दुचाकींसाठी आहे. आमच्या चारचाकी वाहनांना वेगळ्या फ्युचरफॅक्टरीची आवश्यकता असेल. आजचे ट्विट सध्याच्या चारचाकीच्या डिझाईनच्या टीझरच्या अनुषंगाने आहे."

ओला इलेक्ट्रिक कारबद्दल बोलताना, भाविश अग्रवाल यांनी यापूर्वी सांगितले होते की, ओलाची पहिली इलेक्ट्रिक कार 2023 मध्ये येईल आणि या प्रकल्पाला जपानच्या सॉफ्टबँक ग्रुपचे समर्थन मिळेल. भारताला जागतिक इलेक्ट्रिक वाहन हब बनवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. तथापि, ओलाने त्याच्या आगामी इलेक्ट्रिक कारबद्दल अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

ओला इलेक्ट्रिक कार तामिळनाडूतील ईव्ही निर्मात्याच्या प्लांटमध्ये तयार केली जाण्याची शक्यता आहे. या उत्पादन प्रकल्पावर सध्या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी जगातील सर्वात मोठा प्लांट असल्याचा दावा केला जात आहे. भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, ओलाने अलीकडेच आपल्या नवीन कंपनी ओला कार्स अंतर्गत भारतात सेकंड हँड कार विकण्याच्या व्यवसायात प्रवेश केला आहे. कंपनीचे हे युनिट भारतातील अनेक शहरांमध्ये वापरलेल्या कार विकते.