Nissan Magnite च्या भारतातील लॉन्चिंग बद्दल खुलासा, 5.50 लाख रुपये किंमत असण्याची शक्यता- रिपोर्ट

अत्यंत आकर्षक लूक आणि दमदार इंजिन लैस असलेल्या या कारची किंमत आणि इंजिन स्पेक्स संदर्भातील माहिती समोर आली आहे.

Nissan Magnite (Photo Credits- Twitter)

भारतात सब कॉम्पॅक्ट एसयुवी (Sub Compact SUV)  सेगमेंट मध्ये एन्ट्री करत जपानची वाहन निर्माती कंपनी निसान (Nissan) लवकरच त्यांची नवी कार Magnite लॉन्च करणार आहे. अत्यंत आकर्षक लूक आणि दमदार इंजिन लैस असलेल्या या कारची किंमत आणि इंजिन स्पेक्स संदर्भातील माहिती समोर आली आहे. काही डिलरशिप कडून याची बुकिंग सुद्धा सुरु करण्यात आली आहे. तर मॅग्नाइट कंपनी येत्या 26 नोव्हेंबरला लॉन्च करणार असल्याची चर्चा सुरु आहे.

निसान मॅग्नाइट आपल्या सेगमेंट मधील सर्वात स्वस्त एसयुवी असणार आहे. या कॉम्पॅक्ट एसयुवीसाठी 4 ट्रिम XE, XL, XV आणि XV प्रीमियमसह एकूण 8 वेरियंटमध्ये उतरवली जाणार आहे. ज्याची किंमत 5.50 लाख ते 8.15 लाख रुपयांदरम्यान असू शकते. तर निसान मॅग्नाइटच्या 1.0 लीटर XE वेरियंटची किंमत 5.50 लाख, 1.0 लीटर XL ची किंमत 625 लाख रुपये, 1.5 लीटर XV ची किंमत 6.75 लाख रुपये आणि 1.0 लीटर टर्बो XL CVT ची किंमत 8.15 लाख रुपयांपर्यंत असणार आहे.(Seltos आणि Creta ला टक्कर देण्यासाठी Tata च्या 3 दमदार SUV लवकरच होणार लॉन्च, जाणून घ्या अधिक)

आगामी निसान मॅग्नेट ह्युंदाई वेन्यू, महिंद्रा XUV300, किआ सोनेट, टाटा नेक्सॉन, फोर्ड इकोस्पोर्ट आणि मारुती विटारा ब्रेज्जाच्या पसंदीसाठी एक उत्तम ऑप्शन रुपात लॉन्च केली जाऊ शकते. या सेगमेंटची वाढती मागणी पाहता Renault, Citroen, Honda आणि MG Motors भारतीय बाजारात त्यांची नवी SUV तयार करत आहेत.