Maruti Suzuki मधील 3 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता, आर्थिक मंदीचा बसणार फटका

याच पार्श्वभुमीवर आता मोटार वाहनांमधील मारुती सुझीकीच्या (Maruti Suzuki) जवळजवळ 3 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे.

Maruti Suzuki (Photo Credits-Twitter)

सध्या देशात आर्थिक मंदीचा फटका विविध क्षेत्रामधील कंपन्यांना बसत आहेत. याच पार्श्वभुमीवर आता मोटार वाहनांमधील मारुती सुझीकीच्या (Maruti Suzuki) जवळजवळ 3 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. कारण या सर्व कर्मचाऱ्यांचे कॉन्ट्रॅक्ट रिन्यू केले नसल्याने कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा येणार असल्याचे कंपनीचे चेअरमन यांनी माहिती दिली आहे.

कारच्या किंमती वाढण्यामागील टॅक्स वाढ हे प्रमुख कारण आहे. यामुळे ग्राहक कार खरेदी करण्यापूर्वी विचार करत आहेत. परिणामी कार खरेदीचा वेग मंदावला आहे. आर्थिक मंदीमुळे आता पर्यंत 29 हजार कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. मात्र आर्थिक मंदी पुढे ही सुरु राहिल्यास 13 लाख लोकांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.(आर्थिक मंदीचा फटका आता सुतकामाला, हजारो लोकांना नोकरीवर सोडावे लागणार पाणी)

तर जुलै महिन्यात वाहनांच्या उत्पादनात 17 टक्क्यांनी घट झाली आहे. त्याचसोबत NBFC ही आर्थिक अडचणीत सापडली असल्याने ती सुद्धा ऑटो डीलर्स आणि खरेदी करणाऱ्यांना कर्ज देऊ शकत नाही. परिणामी डीलरशीप बंद झाली आहे. त्याचसोबत GST मधील वाढ, नोटाबंदी या सारख्या काही कारणांमुळे ही ऑटो इंडस्ट्रीमध्ये मंदी आल्याचे सांगितले जात आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif