Maruti Suzuki S-Cross चे पेट्रोल मॉडेल येत्या 5 ऑगस्टला होणार लॉन्च, जाणून घ्या खासियत
मारुतीचे हे एस क्रॉस पेट्रोल मॉडेल ऑटो एक्सपो मध्ये झळकवले होते. ही कार एप्रिल महिन्यातच लॉन्च केली जाणार होती. परंतु कोरोना व्हायरसमुळे याचे लॉन्चिंग पुढे ढकलण्यात आले
मारुती सुझुकीची बहुप्रतिक्षित कार Maruti Suzuki S-Cross चे पेट्रोल मॉडेल येत्या 5 ऑगस्ट रोजी लॉन्च करण्यात येणार आहे. मारुतीचे हे एस क्रॉस पेट्रोल मॉडेल ऑटो एक्सपो मध्ये झळकवले होते. ही कार एप्रिल महिन्यातच लॉन्च केली जाणार होती. परंतु कोरोना व्हायरसमुळे याचे लॉन्चिंग पुढे ढकलण्यात आले. त्यानंत एस क्रॉस ही जुलैच्या शेवटच्या आठवड्यात लॉन्च केली जाणार असल्याचे बोलले जात होते. मात्र अखेर ती येत्या 5 ऑगस्टला अधिकृतरित्या लॉन्च करण्यात येणार आहे.
बीएस4 वर्जनमध्ये मारुती एस-क्रॉस फक्त डिझेल इंजिनसह येते. तर अपडेटेड एस-क्रॉसमध्ये बीएस6 कम्प्लायंट 1.5 लीटर पेट्रोल इंजिन दिले जाणार आहे. जे मारुती ब्रेजा मध्ये दिले आहे. हे इंजिन 105bhp ची पॉवर आणि 138Nm टॉर्क जनरेट करते. तसेच 5 स्पीड मॅन्युअल आणि 4 स्पीड ऑटोमेटिक गिअरबॉक्स ऑप्शनसह येणार आहे. मारुतीच्या अन्य एस क्रॉसमध्ये ही डिझेल इंजिन ऑप्शन दिले जाणार नाही आहे.(Skoda Rapid Rider Plus भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि खासियत)
मारुती एस-क्रॉस पेट्रोल चार वेरियंट- Sigma, Delta, Zeta आणि Alpha मध्ये येणार आहे. ऑटोमेटिक गिअरबॉक्स टॉप तीन वेरियंट्स मिळणार आहेत. म्हणजेच Sigma वेरियंटमध्ये ऑटोमेटिकचे ऑप्शन मिळणार नाही आहे. बीएस4 मॉडेलमध्ये एस-क्रॉसची पुर्णपणे रेंज सुझुकीच्या माइल्ड हायब्रिड टेक्नॉलॉजीसह येत होती. तर आता फक्त पेट्रोल मॉडेलमध्ये फक्त ऑटोमेटिक वर्जनमध्ये माइल्ड-हायब्रिड सिस्टिम दिले जाणार आहे.
नव्या इंजिनसह मारुति एस-क्रॉस डिझाइन आणि डायमेन्शन मध्ये कोणताच बदल करण्यात आलेला नाही. पहिल्यासारखीच मारुतीची ही क्रॉसओवर एसयुवी एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, 16-इंच अलॉय वील्ज आणि क्रुज कंट्रोलसह येणार आहे. कॅबिनमध्ये हलक्या स्वरुपाचे अपडेट्स पहायला मिळणार आहेत. अॅपल कारप्ले आणि अॅन्ड्रॉइड ऑटोसह 7 इंचाचा नवा स्मार्टप्ले स्टुडिओ इन्फोटेनमेंट सिस्टम, पुश बटन स्टार्टसह स्मार्ट की, इंटीग्रेटेड टर्न इंडिकेटर्ससह ऑटो-फोल्डिंग आउट साइड रियर व्यू मिरर्स आणि ऑटोमेटिक क्लायमेट कंट्रोल सारखे फिचर्स ही मिळणार आहेत.(पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे त्रस्त? भारतातील 'या' दमदार CNG कारबाबत जरुर जाणून घ्या)
डिझेल इंजिन असणाऱ्या एस-क्रॉसची किंमत 8.81 लाख रुपये होती. पेट्रोल मॉडेलची किंमत कमी ठेवली जाऊ शकते. अपडेटेड एस क्रॉसचे दर 8.5-11.5 लाख रुपयांदरम्यान असण्याची शक्यता आहे. मार्केटमध्ये याची टक्कर ह्युंदाई क्रेटा, किआ सेल्टॉस, रेनॉ डस्टर आणि निसान किक्स सारख्या एसयुवी सोबत होणार आहे.