Mahindra XUV700 मध्ये ग्राहकांना मिळणार धमाकेदार फिचर्स, जाणून घ्या अधिक
ही एक सेव्हन सीटर एसयुवी असणार आहे. ज्यामध्ये ग्राहकांना अधिक स्पेस मिळणार आहे.
महिंद्रा ऑटो (Mahindra Auto) लवकरच आपली XUV700 लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ही एक सेव्हन सीटर एसयुवी असणार आहे. ज्यामध्ये ग्राहकांना अधिक स्पेस मिळणार आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, ग्राहकांना या धमाकेदार एयसुवीच्या डॅशबोर्डवर द्विन स्क्रिन पहायला मिळणार आहे. जसे आलिशान कारमध्ये दिला जातो. तसेच कारमध्य अधिक मोठे केबिन स्पेस मिळणार असल्याने लांबचा प्रवास अधिक सोप्पा होणार आहे.(Nissan Magnite ला टक्कर देण्यासाठी सिट्रोन घेऊन येणार नवी SUV, जाणून घ्या खासियत)
इंजिन आणि पॉवर बद्दल बोलायचे झाल्यास Mahindra XUV700 मध्ये 2.2 लीटरचे 4 सिलेंडर टर्बो डिझेल इंजिन दिले जाऊ शकतो. जो 184bhp ची मॅक्सिमम पॉवरसह 420Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षण असणार आहे. हे इंजिन 6 स्पीड मॅन्युअल आणि 7 स्पीड ऑटोमेटिक ट्रान्समिशनसह उतरवले जाऊ शकते. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, कंपनी या एसयुवी मध्ये एक 20 लीटर GDI टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजीन ऑफर करु शकते.
फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास XUV700 मध्ये नव्या जागतिक एसयुवी प्लॅटफॉर्म W601 वर तयार केली जाणार आहे. एक्सयुवी 700 ची लांबी आणि रुंदी 1920mm आहे. तर उंची 1800mm आणि व्हिलबेस 2865mm असणार आहे. एक्सयुवी700 मध्ये अत्यंत आलिशान केबिन दिले जाणार असून उत्तम फिचर लैस असणार आहे.(Google Assistant च्या मदतीने मिळवा हरवलेला iPhone; काय आहे हे फिचर? जाणून घ्या)
या एसयुवी बद्दल महिंद्राचे ग्लोबल प्रोडक्ट डेव्हलपमेंटचे प्रमुख वेलुसामी यांनी असे म्हटले की, ही कार एक युवा टीमकडून तयार केली गेली आहे. एक्सयुवी पोर्टफोलिओ नेहमी एक्सयुवी 500 आणि एक्सयुवी 300 सारख्या मॉडेलसह उपलब्ध होती. आता नवा बेंचमार्क स्थापित करण्यासाठी ही कार उतरवली जाणार आहे. एक्सयुवी700 नव्या जागतिक एसयुवी प्लॅटफॉर्म W601वर तयाक केली जाणार आहे. जी खास तंत्रज्ञान आणि सुविधा देणार आहे.