Mahidnra Scorpio चे सर्वात स्वस्त S3+ मॉडेल लॉन्च, उत्तम फिचर्ससह मिळणार दमदार डिझाइन

जी तुम्ही ग्रामीण भागात किंवा शहरात कोणत्याही समस्येशिवाय चालवू शकता. त्यामुळे महिंद्राची ही एसयुवी खरेदी करण्याचा विचार करत असाल पण बजेट कमी असेल तर आम्ही तुम्हाला याच्या स्वस्त मॉडेल बद्दल अधिक माहिती देणार आहोत.

महिंद्रा कार ( फोटो सौजन्य-फेसबुक)

Mahindra Scorpio S3+ Base Variant: भारतात महिंद्रा स्कॉर्पिओ एक पॉप्युलर एसयुवी आहे. जी तुम्ही ग्रामीण भागात किंवा शहरात कोणत्याही समस्येशिवाय चालवू शकता. त्यामुळे महिंद्राची ही एसयुवी खरेदी करण्याचा विचार करत असाल पण बजेट कमी असेल तर आम्ही तुम्हाला याच्या स्वस्त मॉडेल बद्दल अधिक माहिती देणार आहोत. खरंतर कंपनीने स्कॉर्पिओचे सर्वात स्वस्त मॉडेल भारतात लॉन्च केला आहे. जे तुमच्या खिशाला सुद्धा परवडणार असून दमदार फिचर्स ही मिळणार आहेत.(3 लाखांहून स्वस्त कारवर दिला जातोय बंपर डिस्काउंट, 39 हजार रुपयांपर्यंत होऊ शकते बचत)

Mahindra Scorpio S3+ बेस मॉडेल असून ज्याची किंमत 11,99,000 रुपये आहे. हे मॉडेल डिझेल ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. पेट्रोलच्या वाढत्या किंमतीदरम्यान या मॉडेलमुळे तुमचा खर्च कमी होण्यास मदत होऊ शकते. याआधी कंपनीने S5 वेरियंट महिंद्रा स्कॉर्पिओचे सर्वात स्वस्त मॉडेल लॉन्च झाले होते. ज्याची सुरुवाती किंमत 12,67,692 रुपये आहे.

Mahindra Scorpio S3+ मध्ये 2.2L चा 2179 सीसी असणारे डिझेल mHawk BSVI इंजिन दिले गेले आहे. हे इंजिन 4000 RPM वर 120 BHP ची कमीतकमी पॉवर आणि 1800-2800 वर 280 Nm चा पीक टॉर्क जनरेट करणार आहे. तसेच इंजिन 5 आणि 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह येणार आहे.(बाइक मधून 'या' कारणास्तव निघतो काळा धूर, लक्ष न दिल्यास होईल मोठे नुकसान)

फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास महिंद्रा स्कॉर्पिओच्या S3+ मध्ये ग्राहकांना फ्रंट ग्रिल इंसटर्स, क्लिअर लेन्स टर्न इंडिकेटर बोनेट स्कूप, रियर फुटरेस्ट, रेड लेन्स एलईडी टेल लॅम्पचा समावेश आहे. त्याचसोबत महिंद्रा स्कॉर्पिओच्या या वेरियंटमध्ये हिटिंग वेंटिलेशन, एसी, टिल्ट स्टिअरिंग, 7 साइड फेसिंग आणि 9 साइड फेसिंग सीटिंग ऑप्शन मिळणार आहेत. सेफ्टीसाठी ग्राहकांना यामध्ये ड्युअल एअर बॅग्स, एबीएस, सीट बेल्ट रिमांइडर लॅम्प, स्पीड अलर्ट, पॅनिक ब्रेक इंडिकेशन, कॉलेप्सिबल स्टिअरिंग कॉलम, इंजिन इम्मोबिलाइजर, ऑटो डोर लॉकसह मॅन्युअल ओव्हर ड्राइव्ह ची सुविधा मिळणार आहे.