Lamborghini Huracan Evo पुढच्या महिन्यात 'या' दिवशी होणार लॉन्च, 2.9 सेकंदात 100kmph वेगाने धावणार

इटालियन कंपनी Lamborghini त्यांची Huracan Evo फेब्रुवारी, 2019 रोजी लॉन्च करणार आहे.

Lamborghini Huracan Evo (Photo Credits- Twitter)

इटालियन कंपनी Lamborghini त्यांची Huracan Evo येत्या 7 फेब्रुवारी, 2019 रोजी लॉन्च करणार आहे. तर फेसलिफ्ट वर्जनमध्ये ही कार लॉन्च करणार आहेत. या कारचे आधिपेक्षा उत्तम मॉडेल, पावर आणि डायामिक डिझायन पद्धतीने तयार करण्यात आलेली आहे. Huracan Evo मध्ये फ्रंट बंपर देण्यात आलेल आहे. तसेच हुआ ऐअर इनटेक्स फिचर Ypsilon शेप देण्यात आला आहे.

Huracan Evo ही मॉडेल एक स्पोर्टकार म्हणून बनविण्यात आलेली आहे. तसेच नवीन स्पोर्ट एग्जॉस्ट सिस्टमसह ट्विन आउटलेट्स देण्यात आले आहे. कंपनीने अंडरबॉडी एयरोडायनामिक्स एफिशियंसीला मोठा आकार देण्यात आला आहे. तसेच पाचपट अधिक उत्तम असे या कारचे मॉडेल बनविण्यात आलेले आहे.

पावर स्पेसिफिकेशनच्या बाबत बोलायचे झाले तर, 5.2 नॅचरल एस्पिरेटेड V10 इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 8000 rpm वर 630bhp पावर आणि 6,500rpm वर 600Nm टॉर्क जनरेट तयार करु शकणार आहे. ही सुपरकार एक्सेलेरेट केल्यावर 0-100kmph च्या वेगासाठी 2.9 सेकंद लागतात.