KTM 250 Duke BS6 भारतात लॉन्च, किंमत 2.09 लाख रुपये
केटीएम 250 ड्युक मध्ये कंपनीने नवी LED हेडलाइटसह नवे डेटाइम रनिंग लाईट्स दिली आहे.
2020 KTM 250 Duke भारतात लॉन्च करण्यात आली असून कंपनीने याची किंमत 2.09 लाख (एक्स शोरुम) ठेवली आहे. केटीएम 250 ड्युक मध्ये कंपनीने नवी LED हेडलाइटसह नवे डेटाइम रनिंग लाईट्स दिली आहे. जी KTM 390 Duke सारखी दिसते आणि KTM 1290 Super Duke पासून प्रेरित आहे. मोटारसायकलमध्ये डुअल-चॅनल सुपरमोटो ABS मोडसह दोन नवे कलर- Dark Galvano आणि Silver Metallic मध्ये येणार आहेत. Supermoto ABS मोडच्या माध्यमातून रियर व्हिल ABS बंद करता येणार आहेत. त्याचसोबत फक्त फ्रंट व्हिलवर काम करणार असून फक्त एका बटनाद्वारे ते करता येणार आहे.
Bajaj Auto लिमिटेडचे प्रेसिडंट, सुमित नारांग यांनी याबाबत असे म्हटले आहे की, KTM 250 Duke प्रीमियम स्पोर्ट्स मोटारसायकल सेगमेंट उत्साही लोकांसाठी एक स्टँडआउट क्वार्टर लीटर बाईक आहे. या मध्ये KTM ची अद्वितीय रेसिंग पॉवर दिसून येणार आहे. हाय-टेक रेसच्या माध्यमातून इंजिन आणि कंम्पोनेंट्स पहायला मिळतात. एक क्वार्टर लीटर KTM रुपाक ही बाईक परफॉर्मेंस आणि शहरातील व्यवहारिकता मध्ये सर्वश्रेष्ठ मानली जाते.(Royal Enfield Meteor 35 आणि Hero Xpulse 200T ऑगस्ट महिन्यात होणार लॉन्च)
KTM डीलर्स या मोटारसायकलच्या बुकिंगसाठी 5 हजार रुपये स्विकारात आहेत. 250 Duke मध्ये कंपनीने BS6 मनकांपेक्षा लैस 248.8cc चे सिंगल-सिलेंडर इंजिन दिले आहे. जो 9,000rpm वर 29.6bhp ची पॉवर आणि 7,500 rpm वर 24Nm चे टॉर्क जनरेट करणार आहे. भारतीय बाजारात याची टक्कर Suzuki Gixxer 250 आणि Husqvarna 250 ट्विन्स सोबत होणार आहे.