India's Cheapest Electric Bike: हैदराबादच्या Pure EV ने लाँच केली देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक बाइक Pure EcoDryft; जाणून घ्या फीचर्स व किंमत
या गाडीचे बुकिंग सुरू झाले असून, त्याची डिलिव्हरी मार्च 2023 पासून सुरू होईल. या बाईकचे स्वरूप अतिशय साधे असून, यात एलईडी लाइटिंग सेटअप आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे.
हैद्राबादच्या (Hyderabad) इलेक्ट्रिक वाहन (Electric Motorcycle) उत्पादक Pure EV ने भारतात आपली इलेक्ट्रिक बाइक Pure EcoDryft लाँच केली आहे. या गाडीची किंमत पाहता ही भारतामधील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक बाइक ठरली आहे. या गाडीचे बुकिंग सुरू झाले असून, त्याची डिलिव्हरी मार्च 2023 पासून सुरू होईल. या बाईकचे स्वरूप अतिशय साधे असून, यात एलईडी लाइटिंग सेटअप आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. हे इलेक्ट्रिक पॉवरट्रेनद्वारे समर्थित आहे. ही गाडी एका चार्जवर 130 किमी पर्यंतचे अंतर पार करू शकते.
ही एक कम्युटर इलेक्ट्रिक बाइक आहे, जी रोजच्या प्रवासासाठी डिझाइन केलेली आहे. दिल्लीमध्ये PURE EV EcoDryft इलेक्ट्रिक मोटरसायकलची एक्स-शोरूम किंमत 99,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या अनुदानाचाही या किमतीत समावेश आहे. ही लॉन्च किंमत केवळ दिल्लीसाठी आहे व Ecodraft ची पॅन इंडिया एक्स-शोरूम लॉन्च किंमत रु. 1,14,999/- आहे. बाइकची ऑन-रोड किंमत राज्यस्तरीय सबसिडी आणि RTO शुल्कानुसार बदलू शकते.
या बाईकमध्ये अँगुलर हेडलॅम्प, पाच स्पोक अलॉय व्हील्स, सिंगल पीस सीट, आकर्षक डिझाइनची इंधन टाकी आहे ज्यामध्ये स्टोरेज उपलब्ध आहे. बाईकला डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, लाइटिंग आणि स्मार्ट लॉकसाठी ऑल-एलईडी सेटअप मिळतो. बाईकचे वजन 101 किलो आहे आणि ती काळ्या, लाल, ग्रे आणि ब्लू शेडमध्ये उपलब्ध आहे. (हेही वाचा: पुणे, नोएडा, सुरत भारतातील प्रमुख शहरांमध्ये लवकरच 25,000 टाटा पावर इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग पॉइंट्स)
कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही इलेक्ट्रिक बाइक एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 130 किमी अंतर कापू शकते. यासोबतच त्याचा टॉप स्पीड 75 किमी प्रतितास आहे. यामध्ये तीन ड्रायव्हिंग मोड आहेत. कंपनीने EcoDryft मध्ये फ्रंट व्हीलमध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेक दिले आहेत, ज्यात कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम उपलब्ध आहे. EcoDryft ही बाईक हैदराबादमधील PURE EV च्या तांत्रिक आणि उत्पादन केंद्रात डिझाइन आणि विकसित केली आहे.