ऑक्टोबर 2018 मध्ये Hundai Santro ची विक्रमी विक्री
भारतीयांची आवडती बजेट कार ह्युंडाई सॅन्ट्रो नव्या स्वरूपात ग्राहकांसाठी खुली करण्यात आली आहे. सध्या या कारची बुकिंग सुरू झाली आहे. अवघ्या 22 दिवसांमध्ये 28800 हून अधिक गाड्या बुक झाल्या आहेत.त्यामुळे ऑक्टोबर 2018 हा महिना ह्युंडाई कंपनीसाठी फारच फायदेशीर ठरला आहे. या महिन्यात सर्वाधिक गाड्यांची बुकिंग झाली आहे. यंदा ऑक्तोबर महिन्यात ह्युंडाईने 52,001 युनिट्स कार विकल्या आहेत. 2017 सालच्या तुलनेत आता 4.9% अधिक विक्री झाली आहे.
ह्युंडाई कार लॉन्च झाल्यानंतर सुरूवातीपासूनच ग्राहकांनी या गाडीला भरघोस प्रतिसाद मिळत होता. सुरूवातीच्या 9 दिवसांमध्येच 14,000 लोकांनी गाड्या बूक केल्या होत्या. तर गाडी लॉन्च होईपर्यंत हा आकडा 23,500 पर्यंत पोहचला होता. ह्युंडाईने दिलेल्या माहितीनुसार, नव्या सेंट्रोसाठी 1,29,500 ग्राहकांनी विचारणा केली होती. नवी हुंडाई सेन्ट्रो 2018 भारतात लॉन्च ; हे आहेत फिचर्स आणि किंमत
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या प्लानमध्ये नियमित 10,000 युनिट्सची निर्मिती होते. सेंट्रो कार विकत घेणार्या ग्राहकांना सध्या कार दारात मिळवण्यासाठी किमान 1-2 महिन्यांचा
कालावधी लागतो. नवी सेंट्रो कार 5 ट्रीम आणि 9 व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. या कारची किंमत 3.89 लाखापासून पुढे आहे.