Hyundai ने झळकवला त्यांच्या पहिल्या मायक्रो एसयुवीचा टीझर, 4 लाख रुपये किंमत असण्याची शक्यता

त्याचा टीझर कंपनीने नुकताच अधिकृतरित्या झळकवला आहे.

Hyundai Micro SUV AX1 (Photo Credits-Twitter)

Hyundai Micro SUV AX1: दक्षिण कोरियाची दिग्गज ऑटोमोबाईल कंपनी ह्युंदाईने गेल्या काही काळापासून आपली मायक्रो एसयुवी (AX1) बद्दल चर्चेत आहे. त्याचा टीझर कंपनीने नुकताच अधिकृतरित्या झळकवला आहे. AX1 पहिल्यांदा कोरियामध्ये रोल आउट केली जाणार असून नंतर भारतात लॉन्च केली जाणार आहे. भारतात ती लॉन्च झाल्यानंतर एसयुवीला टक्कर देणारी ठरणार आहे. समोर आलेल्या टीझरनुसार यामध्ये बेव सारखे पॅटर्नसह फ्रंट ग्रिल दिली गेली आहे. जी कारला पूर्णपणे नवी डिझाइन देते. टीझर पाहिल्यानंतर ती एक बॉक्सी एसयुवी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ह्युंदाई AX1 च्या बंम्परवर एक एलईडी डे टाइन रनिंग लाइट रिंगसह सर्कुलर हेडलाइट्स, वरती एक स्लिक एलईडी डीआरएल दिला गेला आहे. टीझरच्या फोटोत टेललाइट एक त्रिकोणी पॅटर्नमध्ये दिसून येत आहे. जो ह्युंदाई एसयुवीच्या डिझाइन सारखाच आहे.

सध्या प्लॅटफॉर्म आणि पॉवरट्रेन बद्दल कोणतीच माहिती समोर आलेली नाही. मात्र मीडिया रिपोर्ट्नुसार, ही एक मायक्रो एसयेवी K1 प्लॅटफॉर्मवर आधारित असणार आहे. जी ग्रँड आय10 एनओआयएसला सुद्धा रेखांकित करणार आहे. या कारमध्ये इंजिन 1.2 पेट्रोल, 1.0 टर्बो आणि 1.2 डिझेल इंजिन दिले जाऊ शकते.(नवी C5 Aircross SUV ची भारतात डिलिव्हरी सुरु; खरेदीशिवाय तुम्हाला घरी घेऊन जाता येणार, जाणून घ्या कसे)

अशी अपेक्षा केली जात आहे की, AX1 ही 2021 संपण्यापूर्वी आपली वैश्विक सुरुवात करणार आहे. या वर्षाच्या अखेरीस ही कार कोरियामध्ये लॉन्च केली जाऊ शकते. भारतातील लॉन्चिंग बद्दल बोलायचे झाल्यास ही मायक्रो एसयुवीची टेस्टिंग सुरु झाली आहे. 2022 च्या सुरुवातीला ही विक्रीसाठी उपलब्ध करुन दिली जाऊ शकते. किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास ती 4 लाखांपर्यंत असू शकते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif