RTO मध्ये टेस्ट न देता Driving Licence मिळू शकतं; पहा नवा नियम
ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्स ज्यांच्याद्वारा प्रशिक्षण दिले जाते त्यांच्या सर्टिफिकेट्स वरच आता ड्रायव्हिंग लायसंसचे काम होणार आहे.
The Union Ministry of Roads and Motorways यांच्याकडून ड्रायव्हर लायसन्सच्या नियमांमध्य्ये बदल करण्यात आले आहेत. 1 जुलै पासूनच्या नियमांनुसार, आता ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी तुम्हांला आरटीओ ऑफिसमध्ये जाऊन लांब रांगेत उभं राऊन वेळ खर्ची करण्याची किंवा आरटीओ मध्ये ड्रायव्हिंग टेस्ट देण्याचीही गरज नाही.
ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्स ज्यांच्याद्वारा प्रशिक्षण दिले जाते त्यांच्या सर्टिफिकेट्स वरच आता ड्रायव्हिंग लायसंसचे काम होणार आहे. मात्र या मोटार ट्रेनिंग़ स्कूल्स ही केंद्र किंवा राज्य सरकार कडून चालवली जाणारी असावीत. हे देखील नक्की वाचा: Driving Licence Renewal: घरबसल्या करा ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू; फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स.
कशी असेल सोय?
ड्रायव्हिंग लायसन्स साठी अर्ज करणार्यांनी ड्रायव्हर ट्रेनिंग सेंटर मध्ये प्रशिक्षण घ्यावे लागेल. त्यानंतर परीक्षा द्यावी लागेल.
तुमची परीक्षा झाल्यानंतर केंद्राकडून एक सर्टिफिकेट दिले जाईल.
सर्टिफिकेट जारी झाल्यानंतर अर्जदार ड्रायव्हिंग लायसन्स साठी अर्ज करू शकतात. यासाठी आरटीओ च्या टेस्टची गरज नाही.
या ट्रेनिंग सेंटर्समध्ये सिम्युलेटर्स लावले जातील आणि ड्रायव्हींग टेस्ट ट्रॅकही उपलब्ध असणं आवश्यक आहे. ही सेंटर्स light motor vehicles (LMVs) and medium आणि heavy vehicles (HMVs)साठी ट्रेनिंग देऊ शकणार आहेत.
दरम्यान, लाईट मोटार व्हेईकलसाठी ट्रेनिंगचा कालावधी हा 29 तासांचा असणार आहे. हे प्रशिक्षण 4 आठवड्यात पूर्ण करावे लागणार आहेत. या ट्रेनिंग सेंटर्समध्ये लेखी सोबतच प्रॅक्टीकल नॉलेजही दिले जाणार आहे.