भारतात लॉन्च झाल्या दोन नव्या इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जमध्ये 125Km अंतर कापणार

HOP इलेक्ट्रिक मोबिलिटीने भारतात या आर्थिक वर्षाच्या अखेर पर्यंत कमीत कमी पाच इलेक्ट्रिक टू-व्हिलर्स लॉन्च करण्याची योजना तयार केली आहे. त्यानुसार कंपनीने दोन इलेक्ट्रिक स्कूटर HOP Lyf आणि HOP Leo लॉन्च केली आहे.

भारतात लॉन्च झाल्या दोन नव्या इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जमध्ये 125Km अंतर कापणार
HOP Leo (Photo Credits-Twitter)

HOP Electric Scooters Launched: HOP इलेक्ट्रिक मोबिलिटीने भारतात या आर्थिक वर्षाच्या अखेर पर्यंत कमीत कमी पाच इलेक्ट्रिक टू-व्हिलर्स लॉन्च करण्याची योजना तयार केली आहे. त्यानुसार कंपनीने दोन इलेक्ट्रिक स्कूटर HOP Lyf आणि HOP Leo लॉन्च केली आहे. या स्कूटरची किंमत क्रमश: 65,500 रुपये आणि 72,500 रुपये आहे. लॉन्च करण्यात आलेल्या दोन्ही स्कूटर लाइफ आणि लिओच्या मुख्य रुपात तरुणांना आकर्षित करण्यासाठी उतरवली आहे.

HOP Lyf आणि Leo च्या डिझाइन आणि फिचर बद्दल बोलायचे झाल्यास दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर ट्रेंडी डिझाइनमधील आहेत. त्यांना आकर्षक रंगाच्या ऑप्शनमध्ये उतरवण्यात आली आहे. दरम्यान यामध्ये Lyf स्कूटरचे डिझाइन अधिक शार्प आहे. ही एक्सटेंशनसह वी-आकारच्या फ्रंट अॅप्रनसह येणार आहे. Lyf ची आणखी एक खासियत म्हणजे याला बॅक सपोर्ट लैस केले आहे. HOP Lyf ही कंपनीने Basic, Lyf आणि Lyf Extended मध्ये उतरवली आहे. कंपनीने दावा केला आहे की, त्याच्या नव्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 125km ची रेंजसह 180 किलोग्रॅमचा पेलोड, 19.5 लीटरचा बूट स्पेस दिला जाणार आहे.(2021 BMW S1000R भारतात लॉन्च, दमदार इंजिनसह मिळणार हे मोठे डिझाइन अपडेट्स)

HOP Leo बद्दल बोलायचे झाल्यास स्कूटर बोल्ड आणि स्टायलिश लूक लैस आहे. याच्या फ्रंट अॅप्रन लाइफपेक्षा वेगळी आहे. दोन्ही स्कूटरमध्ये ज्या विशेषता एकसारख्याच आहेत. त्यामध्ये एलईडी हेललाइट, स्पोर्टी रियर व्यू मिरर, पूर्णपणे डिजिटल डिस्प्ले, मोबाईल चार्जिंग पोर्ट आणि फ्रंट स्टोरेज स्पेसचा समावेश आहे. दोन्ही स्कूटरमध्ये पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीला आरामदायी प्रवास करता येणार आहे. याची टॉप स्पीड 50 किमी प्रति तास आहे. HOP Lyf आणि Leo ची एक खासियत अशी सुद्धा आहे की, स्कूटर चालवण्यासाठी लागणारी किंमत अधिक कमी आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)


Share Us