Honda च्या नव्या क्रुजर बाईकसाठी Down Payment शिवाय घरी आणता येणार, कंपनीकडून EMI चा ऑप्शन उपलब्ध
अत्यंत आकर्षक डिझाइन आणि दमदार इंजिन लैस या बाइकची किंमत 1.85 लाख रुपयांपासून सुरु होणार आहे.
होंडाने (Honda) नुकत्याच क्रुजर बाइक सेगमेंट मधील एन्ट्री करत H'ness CB350 लॉन्च केली होती. अत्यंत आकर्षक डिझाइन आणि दमदार इंजिन लैस या बाइकची किंमत 1.85 लाख रुपयांपासून सुरु होणार आहे. सध्या या बाइकवर कंपनी भारी डिस्काउंट देत आहे. म्हणजेच ही बाइक डिसेंबर महिन्यात खरेदी केल्यास तुमची बचत होणार आहे. यामध्ये EMI आणि कॅशबॅकचा ऑप्शन ही कंपनीने दिला आहे. तर जाणून घ्या बाइकवरील कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या ऑफर बद्दल अधिक.(भारतात लवकरच येणार नवी इलेक्ट्रिक मोटरसायकल; सिंगल चार्जमध्ये 150km चे अंतर कापणार)
Honda H'ness या महिन्यात कॅश डिस्काउंट आणि काही खास फायनान्स स्किमसह उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्ही ही दमदार बाइक क्रेडिट किंवा डेबिट कार्डच्या EMI ऑप्शनसह खरेदी करु शकता. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना कंपनीकडून 5 हजारांचा कॅशबॅक ही दिला जाणार आहे. तर बाइकचा इएमआय फायनान्स योजनेसाठी कोणत्याही अतिरिक्त कागदपत्र किंवा डाउनपेमेंटची आवश्यकता असणार नाही आहे. या फायनान्स स्किमचा लाभ देशातील सर्व नागरिकांना घेता येणार आहे.(Honda च्या पॉप्युलर सेडानवर दिला जातोय 2.50 लाखांचा बंपर डिस्काउंट, जाणून घ्या किंमतीसह खासियत)
ही ऑफर देशभरत लागू असून ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने वाहन खरेदीचा लाभ घेता येणार आहे. तर कॅश डिस्काउंट आणि फायनान्स स्किम फक्त डिसेंबर 2020 पर्यंतच असणार आहे. सध्या होंडा H'ness CB350 दोन वेरियंटमध्ये उपलब्ध आहे. जी प्रत्येक वेरिटंमध्ये तीन रंगात ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. तर होंडाची ही बाइक भारतीय बाजारात सर्वाधिक विक्री केली जाणारी प्रिमियम मोटरसायकपैकी एक आहे. या बाइकला ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद ही मिळाला आहे. या बाइकची टक्कर Royal Enfield Meteor 350 सोबत होते.