Honda भारतात 30 सप्टेंबरला लॉन्च करणार त्यांची क्रुजर बाइक, Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार
देशात वाढती क्रुजर बाईकची लोकप्रियता पाहता होंडा कंपनी यामध्ये कंपनी अजून एकाची एन्ट्री करणार आहे. होंडा मोटरसायकल अॅन्ड स्कूटर इंडिया भारत यांनी त्यांची क्रुजर बाईक येत्या 30 सप्टेंबरला लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. तर कंपनीने या पूर्वीचा बाईकचा टीझऱ लॉन्च केला होता. तर तुम्ही सुद्धी ही बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तत्पूर्वी याच्या फिचर्ससह किंमती बद्दल येथे अधिक जाणून घ्या.(Hero Splendor Plus BS6 झाली महाग; जाणून घ्या याच्या नव्या किंमतीविषयी)
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, होंडा कंपनीची ही नवी मोटरसायकल होंडा रेबेल 300 वर आधारित असणार आहे. जी कंपनीच्या प्रिमीयम डीलरशीप बिग विंगच्या माध्यमातून विक्री केली जाणार आहे. या बाईकच्या डिझाइनसाटी क्रोमची फिनिशिंग दिली जाणार आहे. तर क्रुजर स्टाइल लैस असणार आहे. त्याचसोबत एक पूर्णपणे ब्लॅकआउट वेरियंट सु्द्धा झळकवली जाऊ शकते. इंजिन बद्दल बोलायचे झाल्यास कंपनी यामध्ये 300cc ते 350cc दरम्यान इंजिन ऑप्शन देण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, होंडाची ही नवी बाईक रॉयल इनफिल्डची अपकमिंग Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार आहे.
सध्या होंडाने या बाइकच्या कॉन्फिगरेशन बद्दल कोणतीच माहिती दिलेली नाही. मात्र टीझरवरुन असा अंदाज लावता येईल की, कंपनी ही हायनेसच्या नावाने भारतात लॉन्च करु शकते. 2017 मध्ये होंडाने भारतात रेबेल डिझाइन पेटेंट केले होते. त्यामुळे ही रेबेलवर आधारित ही असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.(खुशखबर! आता कार आणि दुचाकी विकत घेणे झाले स्वस्त; विमा नियमात झाले बदल, जाणून घ्या सविस्तर)
होंडा कंपनीच्या या नव्या मोटरसायकल संबंधित अधिक माहिती दिली नसल्याने ती लॉन्चिंगवेळीच कळणार आहे. 30 सप्टेंबरला कंपनी ही बाईक अधिकृतरित्या विक्रीसाठी उपलब्ध करुन देणार आहे. तर कंपनीने नुकतीच त्यांची Hornet 2.0 उतरवली आहे. जी मुळ रुपात होंडा CB109R चे डिझाइन वर्जन आहे.