Honda Hornet 2.0 भारतात लॉन्च, दमदार पॉवरसह मिळणार 'हे' खास फिचर्स

याची किंमत 1.26 लाख रुपये ठरवण्यात आली आहे. कंपनीने यापूर्वीच हॉर्नेट 2.0 ची बुकिंग सुरु केली होती.

Hornet 2.0 (Photo Credits-Twitter)

होंडा मोटरसायकल अॅन्ड स्कूटर इंडिया यांनी भारतात त्यांची नवी बाईक Hornet 2.0 लॉन्च केली आहे. याची किंमत 1.26 लाख रुपये ठरवण्यात आली आहे. कंपनीने यापूर्वीच हॉर्नेट 2.0 ची बुकिंग सुरु केली होती. त्यामुळे बुकिंग करण्यात आलेल्या बाईकची डिलिव्हरी येत्या 1 सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. नवी होंडा हॉर्नेट 2.0 चार रंगात पर्ल इगनीस ब्लॅक, मॅट संगरिया रेड मॅटालिक, मॅट मार्वल ब्लू मेटालिक आणि मॅट एक्सिक ग्रे मॅटिलिक मध्ये लॉन्च केली आहे. (Hero Splendor Plus BS6 झाली महाग; जाणून घ्या याच्या नव्या किंमतीविषयी)

हॉर्नेट 2.0 त्यांच्या सेगमेंट मधील सर्वात दमदार आणि आकर्षक बाईक आहे. जी एकदम नव्या प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. डिझाइन बद्दल बोलायचे झाल्यास हॉर्नेट 2.0 साठी शार्प बॉडी कट्स आणि चंकी गोल्डन युएसडी फोर्क मोटर सायकलला स्पोर्टी लूक देतात. त्याचसोबत कंपनीने या बाईकच्याप पुढील बाजूल ऑल-एलईडी सेटअप दिला आहे. ज्यामध्ये हेडलॅम्प, टेल लॅम्प आणि इंडिकेटरचा समावेश आहे. तर बाईकमध्ये एक ब्लू-बॅकलिट डिजिटल कंसोल सुद्धा मिळणार आहे. जो ओडोमीटर, ट्रिप मीटर, गिअर पोझिशन इंडिकेटर, एक क्लॉक आणि इंधन गेज सारखी माहिती दिसून येते.

या बाईकला पॉवर देण्यासाठी 184cc चे HET PGM-FI सिंगल सिलेंडर युक्त एअर-कुल्ड इंजिन दिले आहे. जे 17.27ps ची पॉवर आणि 16.1Nm चा टॉर्क जनरेट करणार आहे. टीवीएस अपाचे आरटीआर 200 4V आणि बजाज पल्सर एनएस 200 च्या तुलनेत हॉर्नेटची पॉवर कमी आहे. याचे इंजिन 5 स्पीड गिअरबॉक्स लैस आहे.  जो 11.25 सेकंदात 200 मीटर पर्यंत अंतर कापण्याची क्षमता ठेवतो. (Honda CBR1000RR-R फायरब्लैड आणि SP वेरियंटमधील बाईकची भारतात बुकिंग सुरु, जाणून घ्या फिचर्स)

नव्या होंडा हॉर्नेट 2.0 मध्ये गोल्डन युएसडी फ्रंट फोर्क्स (200 सीसी सेगमेंट), निगेटिव्ह लिक्विड क्रिस्टल मीटरसह डिजिटल इंस्ट्रुमेंट कंसोल, 276 मिमी आणि 220 मिमीचे पॅटल डिस्क ब्रेक, सिंगल चॅनस एबीएस, इंजिन किल स्विच, वायडर ट्युबलेस टायर, हॅजार्ड स्विच हे या बाईकचे प्रमुख फिचर्स आहेत.