Honda कंपनीच्या कारवर तब्बल 4 लाख रुपयांची बंपर सूट
यामुळे काही प्रमुख कंपन्या त्यांच्या कारवर शानदार सूट देण्याच्या तयारीत आहे. त्यात आता होंडा (Honda) कंपनीसुद्धा सहभागी असून त्यांच्या कारवर तब्बल 4 लाख रुपयांची बंपर सूट दिली जात आहे.
ऑटोमाबाइल कंपन्यांच्या गाड्यांची विक्री सध्या फारशी होत नाही आहे. यामुळे काही प्रमुख कंपन्या त्यांच्या कारवर शानदार सूट देण्याच्या तयारीत आहे. त्यात आता होंडा (Honda) कंपनीसुद्धा सहभागी असून त्यांच्या कारवर तब्बल 4 लाख रुपयांची बंपर सूट दिली जात आहे. त्यामुळे जर तुम्हाला होंडा कंपनीची कार खरेदी करयाची असल्यास ही योग्य वेळ आहे.
होंडा कंपनीची सर्वात पॉप्युलर सब-कॉम्पॅक्ट सिडॅन कारवर 42 हजारापर्यंत सूट मिळणार आहे. Ace Edition सोडून Honda Amaze वर चार ते पाच वर्षापर्यंत एक्सटेंडेड वॉरंटी देण्यात आली आहे. तसेच 30 हजार रुपयांचा एक्ससेंज बोनस सुद्धा देण्यात येणार आहे. तसेच जर कार तुम्ही एक्ससेंज काही वर्षांनी करणार नसल्यास त्यावर होंडा केअर मेन्टेनन्स ग्राहकाला मिळणार आहे. होंडा अमेझ या कारची किंमत 5.93 लाख रुपये आहे.(तुमच्या गाडीमध्ये लावण्यात आलेला पार्ट चोरीचा तर नाही? 'या' पद्धतीने तपासून पाहा)
होंडाच्या प्रिमिअम हॅचबॅक कारवर 50 हजार रुपयापर्यंत डिस्कांउंट मिळणार आहे. त्यामध्ये 25 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट आणि 25 हजार रुपयांची एक्सजेंच ऑफर देण्यात आली आहे. या कारची सुरुवाती किंमत 7.45 लाख रुपये आहे. तसेच होंडाच्या पॉप्युलर सिडेन कारवर 62 हजार रुपयांची सूट मिळणार आहे. या कारची किंमत 9.81 लाख रुपये आहे.