Hero Splendor Plus आणि Hero Glamour वर मिळतोय बंपर डिस्काउंट, जाणून घ्या यामधील कोणती बाइक तुमच्यासाठी ठरेल दमदार

Hero Splendor Plus(Photo Credits: Twitter)

Hero Splendor Plus आणि Hero Glamour भारतात अत्यंत पॉप्युलर बाइक्स आहेत. Hero MotoCop या दोन्ही बाइक्सवर येणाऱ्या फेस्टिव्ह सीजनमध्ये जबरदस्त डिस्काउंट देणार आहे. त्यामुळे जर तुम्ही नवी बाइक खरेदी करण्याचा विचार करत असल्यास याबद्दल आधी अधिक माहिती येथे जाणून घ्या. तसेच या दोन्ही बाइक्समधील कोणती तुमच्यासाठी बेस्ट ठरणार हे सुद्धा तुम्हाला कळू शकणार आहे.(Mahindra XUV500 Car: कमी पैशात चांगली कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर 'महिंद्रा एक्सयूव्ही 500' ठरू शकते बेस्ट ऑपशन; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स)

Hero Splendor Plus मध्ये 97.2cc चे एअर कूल्ड इंजिन दिले गेले आहे. जे 7.9bhp ची पॉवर आणि 8.05Nm चे टॉर्क जनरेट करणार आहे. यामध्ये 4 स्पीड गिअरबॉक्स सुद्धा लावण्यात आले आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान तुम्हाला उत्तम अनुभव देण्यासाठी सक्षम आहे. तसेच Hero Glamour मध्ये पॉवरसाठी 124.7cc चे इंजिन दिले गेले आहे. याचे इंजिन 7500 आरपीएमवर 11.6PS ची मॅक्सिमम पॉवर आणि 6500 आरपीएमवर 11Nm चे पीक टॉर्क जनरेट करणार आहे. याचे इंजिन 4 स्पीड गिअरबॉक्स लैस आहे.

Hero Splendor Plus च्या ब्रेकिंग सिस्टिम बद्दल सांगायचे झाल्यास याच्या फ्रंट आणि रियर दोन्ही व्हिल्ससह 130mm ड्रम ब्रेक ऑप्शनसह येणार आहेत. Glamour मध्ये ब्रेकिंग सिस्टिमसाठी फ्रंटला 240mm डिस्क ब्रेक आणि 130mm ड्रम ब्रेकचे ऑप्शन आणि रियरमध्ये 130mm ड्रम ब्रेक दिले गेले आहे.(Honda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल)

Hero Splendor Plus च्या फ्रंटला टेलिस्कोपिक शॉक एब्जॉबर्स आणि रियरमध्ये 5 स्टेप अॅडजेस्टेबल हायड्रॉलिक शॉक अॅब्जॉबर्स दिले गेले आहेत. तर Glamour च्या सस्पेंशनसाठी याच्या फ्रंटला टेलिस्कोपिक फ्रंट फॉर्क्स सस्पेंशन आणि रियर मध्ये 5 स्टेप अॅडजेस्टेबल हायड्रॉलिक शॉक अॅब्जॉबर सस्पेंशन दिले आहे.

डायमेंशन बद्दल सांगायचे झाल्यास स्प्लेंडर प्लसची लांबी 2000mm, रुंदी 720mm आणि उंची 1052mm, व्हिलबेस 1235mm, ग्राउंड क्लिअरेंस 165mm आहे. Hero Glamour चे डायमेंशन हे लांबी 2023mm, रुंदी 766mm, उंची 1091mm आहे. याचे व्हिलबेस 1262 mm असून ग्राउंड क्लिअरेंस 159mm आहे.(BS6 इंजिनसह Hero Maestro Edge 110 लॉन्च, जाणून घ्या किंमत)

किंमतीबद्दल माहिती द्यायची झाल्यास Hero Splendor Plus ही 60,960 रुपयांत खरेदी करता येणार आहे. तर Hero Glamour ची किंमत 69,950 रुपये आहे. ऑफरसाठी कंपनी फेस्टिव्ह सीजनमध्ये बाइक्सच्या खरेदीवर तुम्हाला हजारो रुपयांचा फायदा करुन देणार आहे. यामध्ये 4999 रुपयांचा लो डाउन पेमेंट, 6.99 टक्के लो इंट्रेस्ट रेट आणि 3100 रुपयांचा कॅश डिस्काउंट देणार आहे. त्याचसोबत बाइक्ससोबत 1000 रुपयांपर्यंत एक्सचेंज बेनिफिट मिळणार आहे.