1 जानेवारी पासून सार्वजनिक प्रवास गाड्यांमध्ये VLTs आणि Panic Button असणे अनिवार्य
येत्या नव वर्षात मिनिस्ट्री ऑफ रोड आणि ट्रांसपोर्ट अँड हायवे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे नागरिकांच्या सुरक्षततेबाबत वाढ होणार आहे.
येत्या नव वर्षात मिनिस्ट्री ऑफ रोड आणि ट्रांसपोर्ट अँड हायवे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे नागरिकांच्या सुरक्षततेबाबत वाढ होणार आहे. तसेच सार्वजनिक प्रवास गाड्यांमध्ये ट्रेसिंग डिव्हाईस (VLTs) आणि पॅनिक बटण असणे अनिवार्य करण्यात आले आहे.
सार्वजनिक प्रवास गाड्यांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी नवीन उपाय योजना करण्यात आली आहे. तसेच रिक्षा आणि ई-रिक्षासाठी हा नियम लागू करण्यात आलेला नाही. परंतु 1 जानेवारी नंतर रजिस्ट्रेशन झालेल्या वाहनांसाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. या वित्तीय वर्षाच्या सुरुवातीला नवीन नियमावली नुसार AIS140 मध्ये प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजिक प्रवास गाड्यांमध्ये वीकल्स लोकेशन ट्रेसिंग डिवाइस (VLTs) आणि पॅनिक बटण असणे आवश्यक आहे.
VLTs आणि पॅनिक बटण वाहनामध्ये लावल्याने काय फायदा होणार
AIS140 खासरकरुन महिलांच्या सुरक्षिततेसाठी बनविण्यात आला आहे. तसेच विद्यार्थी आणि इतर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ही या यंत्रणेचा उपयोग होणार आहे. त्याचसोबत औषधोपचार सेवा ही पुरविण्यात येणार आहे. गाडीमधील ही यंत्रणा जागेचे ठिकाण ट्रेस करु शकणार असल्याने वाहतुक संबंधित सर्व माहिती उपलब्ध होणार आहे.