Harrier पासून Safari पर्यंत, टाटाच्या कारवर तब्बल 1 लाखाहून अधिक सूट; जाणून घ्या कोणत्या गाडीवर किती डिस्काउंट
ऑक्टोबर 2019 मध्ये कंपनीची वार्षिक-वर्ष (YOY) वाढ 28 टक्क्यांनी घटली आहे. या महिन्यात कंपनीने एकूण 13,169 कारची विक्री केली. तर मागील वर्षी याच महिन्यात कंपनीने 18,290 वाहनांची विक्री केली होती.
देशातील मंदीमुळे टाटा मोटर्सच्या (Tata Motors) विक्रीवर फार मोठा परिणाम झाला आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये कंपनीची वार्षिक-वर्ष (YOY) वाढ 28 टक्क्यांनी घटली आहे. या महिन्यात कंपनीने एकूण 13,169 कारची विक्री केली. तर मागील वर्षी याच महिन्यात कंपनीने 18,290 वाहनांची विक्री केली होती. आता कंपनी आपल्या गाड्यांची विक्री वाढवण्यासाठी आपल्या बर्याच मॉडेल्सवर सूट ऑफर देत आहे. जर आपण नवीन कार घेण्याची योजना आखत असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. कारण सध्याच्या या सेलमध्ये टाटाच्या कारवर तब्बल 1 लाखापर्यंत सूट मिळणार आहे. पहा यादी
टाटा टियागो -
या लोकप्रिय टाटा कारवर कंपनी 45, 000 रुपयांची सूट देत आहे. या गाडीच्या डीझेल इंजिनला कंपनी बीएसव्हीआयमध्ये अपग्रेड करत नसल्याने, कंपनी या कारची अधिकाधिक युनिट्स विकण्याचा प्रयत्न करीत आहे.
टाटा टिगोर -
या कारवर तुम्हाला 62,000 रुपयांची सूट मिळत आहे. मंदीमुळे अलीकडच्या काळात या कारच्या विक्रीत लक्षणीय घट झाली आहे. सध्या या कारची सरासरी विक्री दरमहा 2,500 युनिट्स आहे.
टाटा जेस्ट -
या महिन्यात तुम्ही टाटा झेस्ट 70,000 रुपयांच्या सवलतीत खरेदी करू शकता. ही सवलत मोटारींच्या पूर्ण श्रेणीवर देण्यात येत आहे.
टाटा नेक्सन -
सध्या टाटा नेक्सन 52,000 रुपयांच्या सवलतीत खरेदी करता येईल. या कॉम्पॅक्ट एसयूव्हीची विक्री सातत्याने कमी होत असल्याने ही सवलत देण्यात आली आहे.
टाटा हेक्सा -
कंपनी या कारवर 1.1 लाखांची जोरदार सवलत देत आहे. ही कार फक्त डिझेल इंजिनसह येते.
सफारी स्टॉर्म SUV -
ही कार कंपनीच्या लोकप्रिय गाड्यांपैकी एक आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी या कारवर 75,000 रुपयांची सूट देत आहे. (हेही वाचा: खुशखबर! येत्या 6 महिन्यांत लाँच होणार या 7 SUV; जाणून घ्या वैशिष्ठ्ये आणि किंमत)
टाटा हॅरियर -
टाटा कंपनींची ही कार नुकतीच बाजारात आली आहे. हेक्टर आणि सेल्टोस लॉन्च होण्यापूर्वी या कारची भारतात चांगली पसंती होती. आता कंपनी या कारवर 70,000 रुपयांची सूट देत आहे.
टाटा बोल्ट -
टाटा बोल्ट कारवर 70,000 रुपयांची सूट देण्यात येत आहे. कार विक्रीत घट झाल्यानंतर कंपनीला सवलत देऊन या कारची विक्री वाढवायची आहे.
दरम्यान, गाड्यांच्या पेट्रोल आणि डिझेल प्रकारांची रोख सवलत अनुक्रमे 10,000 आणि 20,000 रुपये आहे. जेटीपी ट्विन्सवर कोणतीही सूट नाही.