Ford कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत

अमेरिकेची प्रमुख वाहन निर्माती कंपनी फोर्डने (Ford) भारतात आपली पॉप्युलर हॅचबॅक फिगोच्या (Figo) एएमटी वेरियंट नुकतीच लॉन्च केली आहे.

Ford Figo (Photo Credits-Twitter)

अमेरिकेची प्रमुख वाहन निर्माती कंपनी फोर्डने (Ford) भारतात आपली पॉप्युलर हॅचबॅक फिगोच्या (Figo) एएमटी वेरियंट नुकतीच लॉन्च केली आहे. कंपनीने आपली ऑटोमॅटिकसह ती दोन ट्रिम्समध्ये उतरवली आहे. ज्यामध्ये टाइटेनियम आणि दुसरा टाइटेनियम प्लस ट्रिमचा समावेश आहे. दोन्ही ट्रिम्सची किंमत क्रमश: 7.75 लाख रुपये आणि 8.20 लाख रुपये ठरवण्यात आली आहे. कंपनीकडून आधीपासूनच फिगोच्या ऑटोमॅटिक वेरियंट लॉन्च करण्याची तयारी केली जात होती. जी अखेर आता बाजारात लॉन्च करण्यात आली आहे.

फोर्डने फिगो AT ही दोन ट्रिममध्ये उतरवली आहे. ज्यामध्ये टाइटेनियम आणि टाइटेनियम प्लसचा समावेश आहे. तर टाइटेनियम मध्ये 15 इंचाचा अलॉय व्हिल, पुश-बटण स्टार्ट/स्टॉप, सात इंचाचा टचस्क्रिन, फोर्डपास कनेक्ट सारखे फिचर्स दिले आहेत. तर टाइटेनियम प्लसमध्ये या सर्वांसह रेन-सेंसिग वाइपर, ऑटोमॅटिक हेडलॅम्प आणि ऑटोमॅटिक एसीचा समावेश करण्यात आला आहे.(Audi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये)

फिगोच्या नव्या गिअरबॉक्स बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये एक सेलेक्ट शिफ्ट मोड दिले आहे. त्याचा वापर करुन मॅन्युअल रुपात गिअर कंट्रोल करता येणार आहे. गिअर लीव्हरवर एक टॉगल स्विच असतो त्याचा वापर गिअर वर किंवा खाली करण्यासाठी होतो. यामध्ये एक स्पोर्ट मोड सुद्धा दिला असून जो कंपनीनुसार अत्यंत उत्तम परफॉर्मेन्ससाठी गिअरबॉक्सला कम्पॅटिबल बनवतात.

कारच्या सुरक्षित सुविधांमध्ये टाइटेनियम वेरियंटसाठी डुअल फ्रंट एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, एबीएससह ईबीडी, रिवर्स पार्किंग कॅमेरा आणि हिल लॉन्च असिस्टचा समावेश आहे. याचा टाईटेनियम प्लस वेरियंटमध्ये सहा एअरबॅग्स दिल्या जातात. तर फोर्ड फिगो AT हॅचबॅक 1.2 लीटर ते तीन- सिलेंडर इंजिनसह येणार आहे. जो 95bhp ची पॉवर आणि 119Nm चा पीक टॉर्क देणार आहे. ही मोटर डेडिकेट स्पोर्ट्स मोडसग सिक्स स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सला जोडले आहे.